AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पक्ष गेला, चिन्ह गेले, आता उद्धव ठाकरे यांच्याकडे काय? किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आम्हाला पर्याय…

दादरच्या शिवाजी मंदिर येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुंबई पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत बोलताना माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उद्धव ठाकरे यांना थेट उत्तर दिलं.

पक्ष गेला, चिन्ह गेले, आता उद्धव ठाकरे यांच्याकडे काय? किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आम्हाला पर्याय...
SHIVSENA LEADER KISHORI PEDNEKARImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jun 24, 2023 | 1:47 PM
Share

मुंबई : कोरोना काळात कोविड सेंटर घोटाळा झाल्याच्या आरोपावरून ईडीने आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची सुमारे 19 तास चौकशी केली. त्यानंतर सोमवारी ईडी कार्यलयात हजर राहण्याचे समन्स सूरज चव्हाण यांना बजावण्यात आले आहे. तसेच, तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांचीही ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. अशातच आज दादरच्या शिवाजी मंदिर येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुंबई पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक बोलावण्यात आली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आदी नेत्यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले. या बैठकीत बोलताना माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उद्धव ठाकरे यांना थेट उत्तर दिलं.

कोरोना सेंटर उभे करण्याचे जे स्किल आहे ते महापालिका अधिकारी आणि आदित्य उद्धव ठाकरे यांचे आहे. त्यांनी वेळोवेळो मार्गदर्शन केले. सध्या युके आणि इतर देशात जे युद्ध चालूं आहे त्यात pendamik कायदा आहे. या कायद्यानुसार लोकांचे जीव वाचविण्यासाठी जे आवश्यक आहे ते ते करावे असा नियम आहे. कोरोना काळात आम्ही त्याच नियमानुसार काम केले. प्रत्येक नियमाचे पालन केले. हे प्रत्येक नगरसेवकाला माहित आहे, असे त्या म्हणाल्या.

कोरोना काळात स्पॉट कोटेशन काढले. टेंडर काढले. यात नगरसेवक किंवा महापौर यांचा काय संबंध? सगळी टेंडर ही स्टँडिंगमध्ये पास होतात. त्यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक असतात. ते सर्व मिळून ते टेंडर पास करतात. मग, त्याला फक्त स्टॅंगिंग चेरअमन जबाबदार कसा? तेथे विरोधी पक्ष नेतेही असतात. अशावेळी त्यांची जबाबदरी काय? असा सवाल त्यांनी केला.

आपल्यावरच सगळं टाळायचं आणि ओझे मात्र उद्धव, आदित्य यांच्या माथ्यावर मारायचे असे प्रकार सुरु आहेत. सगळ्याचा त्रास प्रचंड आहे. पण, जसा उन्हाळा वाढतो तसे आपण पर्याय शोधतो. पंख लावतो, एसी लावतो. तसाच हा त्रास आहे. आम्हाला ईडीमध्ये अडकवलं जात आहे. परंतु, आम्हाला काहीही फरक पडत नाही. आता आम्हाला त्यांना पर्याय द्यायचे नाही. आमच्याकडे शिवसैनिक नावाचा तोफगोळा आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी दिला.

माझा पक्ष आहे मी येणारच

सगळीकडे बातम्या पेरण्याचे काम सुरु आहे. मी बैठकीला आली तेव्हा अनेकजण म्हणत होते तुम्ही येणार नव्हते ना? मी काही यांच्या स्वप्नात येऊन सांगितले होते का? की मी येणार नाही. असेच सेना भवनात होतो तेव्हा मला एकजण म्हणाला सुनील शिंदे गेले. तेव्हा मी त्यांना म्हटले की सुनील शिंदे वर आहेत. खाली बोलवते. अख्ख बघून घे. मुद्दाम अशा बातम्या चालवल्या जातायत. पण हा पक्ष माझा आहे आणि मी पक्षासाठी येणारच. वायकर, साळवी यांच्याही काही बातम्या चालल्या आहेत. आशिष चेंबूरकर यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते आलेले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्टँडिंगचा चेयरमन रडत होता

दोन दिवसापासून बातम्या चालल्या आहेत की कोविड काळातील मृत देहाच्या बॅगांमध्ये गैरव्यवहार झाला. महापौर पद की शोभेच पद असं स्वतः अधिकारी म्हणतात. गाडी दिली की फिरायचं. मस्त राहायच. पण, घरच्या लोकांनी मला संस्कार दिले आहेत. कोव्हीड काळात आम्ही सर्व प्रयत्न केले. मला संधी दिली. त्यावेळी स्टँडिंगचा चेयरमन रडत होता अशी टीका त्यांनी यशवंत जाधव यांचे नाव न घेता केली. आम्हाला म्हणतात घरात बसलेला होता. मग, पंतप्रधान कुठे होते? हे फक्त … असा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबई जिंकायची म्हणजे जिंकायची

2017-2018 ला पाऊस आले ते थोडे आठवा. आता कायम अतिवृष्टी होतेय. सर्वजण बड्डेला केक कापतात पण झाड लावत नाहीत. मुंबईत आपण काम केलं. त्यामुळे मुंबईतील काम बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे. मुंबईत आता पाणी भरत नाही तरीही आमचं नावडतीच मीठ अळणी. कमी काळात आपण इथे जमा झालो आहोत. आम्हाला मुंबई जिंकायची म्हणजे जिंकायची असा किशोरी पेडणेकर यांनी विश्वास व्यक्त केला.

लाख मोलाचे शिवसैनिक आहेत

आमच्या शाखा तोडल्या जात आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे फोटोही काही ठिकाणी चिरडले आहेत. उद्धव साहेब म्हणतात माझ्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही, निशाणी नाही. ते सांगतात माझ्याकडे काही नाही पण मी त्यांना सांगते की लाख मोलाचे शिवसैनिक त्यांच्याकडे आहेत. जोपर्यत आम्ही तुमच्यासोबत आहोत तोपर्यंत तुम्ही एकटे नाही असे त्या म्हणाल्या.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.