औरंगाबाद नामांतरावरुन माजी आमदार हर्षवर्धन जाधव आक्रमक, काय दिला इशारा…

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले त्याची घोषणाही झाली मात्र अजून राजपत्र न काढल्याने हर्षवर्धन जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

औरंगाबाद नामांतरावरुन माजी आमदार हर्षवर्धन जाधव आक्रमक, काय दिला इशारा...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 9:10 AM

दत्ता कानवटे, औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा तापला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील आक्रमक होऊ लागले आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यावरून माजी आमदार हर्षवर्धन जाधव आक्रमक झाल्याने हा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यासाठी राजपत्रच काढला नसल्याचा हर्षवर्धन जाधव यांनी दावा केला आहे. नाव बदलण्याच्या नावाखाली राज्य सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप ही हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याबाबत घोटाळा झाल्याचा हर्षवर्धन जाधव यांनी आरोप केला असून शहराचे नाव बदलण्यासाठी मैदानात उतरण्याचा इशारा देखील दिला आहे. सुरुवातीपासूनच औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन मतमतांतरे आहेत.

महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची स्थिती असतांना औरंगाबाद शहराचे नामांतर करण्यात आले होते.

त्यानंतर सत्तेत आलेले शिंदे सरकार यांनी महाविकास आघाडी सरकारने नामांतर केलेला निर्णय रद्द करून पुन्हा नवीन निर्णय घेतला होता.

हे सुद्धा वाचा

त्याबाबत राज्यातील काही शहरांचे नाव बदलण्यात आले होते, त्यापैकी औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले होते.

अनेक ठिकाणी तसा उच्चार केला जातो, अनेक ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असे लिहिलेले बघायला मिळाले. इतकेच काय महाराष्ट्र शासनाच्या शिवशाही बसवर बघायला मिळाले.

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले त्याची घोषणाही झाली मात्र अजून राजपत्र न काढल्याने हर्षवर्धन जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला असून सरकारवर टीका केली आहे, त्यामुळे येत्या काळात नामांतराचा पुन्हा एकदा तापणार हे निश्चित झाले आहे.

त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार याबाबत काय भूमिका घेते, जाधव यांची भूमिका पाहता राजपत्र काढले जाते का ? याकडे लक्ष लागून आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.