“…आता माणुसकी पुढं तुम्हाला संप मोठा झाला का?”; या नेत्याचा संप करणाऱ्यांना कवितेतून केला उद्विग्न सवाल

शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी बेमुदत आंदोलन पुकारले आहे, तर दुसरीकडे शेतकरी अवकाळी पावसाच्या संकटात सापडला आहे. त्यामुळे आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या कवितेतून सरकारी कर्मचाऱ्यांना सवाल उपस्थित केला आहे.

...आता माणुसकी पुढं तुम्हाला संप मोठा झाला का?; या नेत्याचा संप करणाऱ्यांना कवितेतून केला उद्विग्न सवाल
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 3:17 PM

कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी 14 मार्चपासून शासकीय कर्मचारी बेमुंदत संपावर आहेत. त्यामुळे शासकीय कामांना अडथळा आला आहे. त्यातच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे शेतमालाला योग्य बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे सगळ पिकं वाया गेली आहेत. त्यामुळे आता अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार कोण असा सवाल शेतकरी करत आहेत.

शेतकरी चिंताग्रस्त असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची एक कविता आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.  त्यांनी शेतकरी आणि शासकीय कर्मचारी यांच्या कामाबद्दल शेतकऱ्यांच्यावतीने काही सवाल उपस्थित केले आहेत.

शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारल्यानंतर काही दिवसातच अवकाळी पावसाने धूमाकूळ घातला. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना त्याचा फटका बसला आहे.

त्यानंतर अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतीचे आता पंचनामे कोण करणार आणि झालेल्या नुकसानीची भरवाई मिळणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या या प्रश्नांना खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या कवितेतून वाचा फोडली आहे.

राजू शेट्टी यांनी आपल्या कवितेतून सरकारी कर्मचाऱ्यांना जाब विचारताना ते म्हणाले राज्यात शेतकऱ्यांची आंदोलनं झाली मात्र त्यांनी कधीच कुणाची अडवणूक केली नाही. कांदा कवडीमोल भावाने विकला गेला मात्र शेतकऱ्यांनी माणसांच्या भाज्या कधी बेचव होऊ दिल्या का असा सवाल केला आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसाठी कविता करताना कांदा, ऊस, दूध आंदोलनासह अनेक आंदोलनं शेतकऱ्यांनी केली मात्र त्यांनी कधीच कुणाची अडवणूक केली नाही.

मग आता शेतकऱ्यांवर अवकाळी आणि गारपीटीमुळे वाईट दिवस आले आहेत. त्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासाठी आता पंचनामे होणे गरजेचे आहे.

म्हणून राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, आज गारपीट झाली, अवकाळी झाला, आता माणुसकी पुढं तुम्हाला संप मोठा झाला का? असा उद्विग्न सवाल त्यांनी आपल्या कवितेतून शासकीय कर्मचाऱ्यांना केला आहे.

त्यामुळे त्यांनी राज्यात शेतकऱ्यांची आंदोलनं झाली असली तरी त्यांनी जनसामान्यांची महिलांची आणि विद्यार्थ्यांची कधीच अडवणूक केली नाही.

म्हणून त्यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे की, सरकारी संपकऱ्यांनो, आज गारपीट झाली, अवकाळी झाली, आता माणुसकी पुढं तुम्हाला संप मोठा झाला का असा सवा त्यांनी उपस्थित केला आहे.

Non Stop LIVE Update
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले.
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास.
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान.
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य.
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन.
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले...
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले....
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं.
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर.
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल.
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे.