कराडमध्ये चार पायाची कोंबडी सापडली!

कराडमध्ये चार पायाची कोंबडी सापडली!

सातारा : चार पाय असलेली बॉयलर कोंबडी सध्या कराडमध्ये लोकप्रिय होत आहे. साताऱ्यातील कराड शहरात जुबेर पटवेकर हे जुबेर चिकन सेंटर चालवतात. त्यांच्याकडे चिकन कटिंगसाठी आलेल्या जिवंत बॉयलर कोंबडयांमध्ये ही चार पाय असलेली कोंबंडी आढळून आली. या चार पायाच्या कोंबडीला बघण्यासाठी लोक चिकन सेंटरवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. कराड परिसरात ही चार पायाची कोंबडी कुतूहलाचा विषय ठरत आहे.

या कोंबडीली बघण्यासाठी लोक दुकानात गर्दी करत असल्याने व्यवसायात वाढ झाली आहे. त्यामुळे जुबेर पटवेकर यांनी ही कोंबडी संभाळण्याचा निर्णय घेतला आहे. दोन गर्भ एकत्र येऊन जुळे तयार होता होता राहून गेल्याने हा प्रकार घडून आल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

जुबेर पटवेकर यांच्या दुकानात चिकन कटिंगसाठी आलेल्या जिवंत बॉयलर कोंबडयांमध्ये ही चार पाय आणि दोन गुदद्वार असलेली कोंबंडी आढळून आली. त्यांनी या कोंबडीला दुकानात ठेवले, ही बातमी कराडमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे या कोंबडीला बघण्यासाठी लोकांची गर्दी जमायला लागली.

‘अनेक वर्षांपासून मी चिकन व्यवसायात आहे, पण ही अशा  प्रकारची कोंबडी मी प्रथमच बघितली. ग्राहकांकडून या कोंबडीची मागणी होत आहे, मात्र मी तिला संभाळणार आहे’ अशी प्रतिक्रिया जुबेर पटवेकर यांनी दिली.

जास्तीचे शारीरिक अवयव हा प्रकार मानवासह पशु-पक्षांमध्ये अतिशय दुर्मिळ आहे. लाखात एखादे अशाप्रकारचे उदाहरण बघायला मिळते. दोन गर्भ ऐकत्र येऊन जुळे तयार होता होता राहून गेलेला हा प्रकार असू शकतो किंवा कंझेनेटेड अबनॉर्मालिटी असू शकते. यात कुठलाही दैवी चमत्कार नाही, अशी प्रतिक्रिया पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

Published On - 7:06 pm, Thu, 3 January 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI