रायगडमधील वादळग्रस्त कुटुंबांना 5 लिटर मोफत केरोसिन देणार : छगन भुजबळ

रायगडमधील वादळग्रस्त कुटुंबांना 5 लिटर मोफत केरोसिन देणार : छगन भुजबळ

राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून बाधित कुटुंबांना मोफत केरोसिनचे वाटप करण्यात येणार आहे.

Nupur Chilkulwar

|

Jun 07, 2020 | 9:10 PM

रायगड : रायगड जिल्ह्याला 3 जूनला निसर्ग चक्रीवादळाचा (Free Kerosene To Cyclone Victims) जोरदार फटका बसला. त्यामुळे येथील भागात वीज पुरवठा सध्या खंडित झाला आहे. मात्र, अनेक कुटुंबांकडे दिवे लावण्यासाठी केरोसिनही नाही. त्यामुळे राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून बाधित कुटुंबांना मोफत केरोसिनचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच, राज्यातील इतर नुकसानग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची मागणी असल्यास त्यांनाही केरोसिन पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती (Free Kerosene To Cyclone Victims) अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.

छगन भुजबळ म्हणाले, केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्ती, मत्स्यव्यवसाय, धार्मिक समारंभ, यात्रा आणि मेळावे इत्यादी प्रयोजनांकरिता विनाअनुदानित दराचे केरोसिन राज्यास उपलब्ध करुन दिले आहे. त्या अनुषंगाने रायगड  जिल्ह्यामध्ये 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना प्रति कुटुंब मोफत केरोसिन उपलब्ध करुन देण्यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, जिल्ह्यातील 7 लाख 69 हजार 335 इतक्या शिधापत्रिकाधारकांना प्रतिशिधापत्रिका 5 लिटर केरोसिन वितरित करण्यासाठी विनाअनुदानित दराचे केरोसिन मंजूर करण्यात येत आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबाना वाटप करावयाच्या विनाअनुदानित केरोसिनची उचल संबधित घाऊक केरोसिन परवानाधारकांमार्फत तेल कंपन्यांच्या संबंधित डेपोतून करुन त्याचे वितरण बाधित कुटुंबांना प्रति कुटुंब 5 लिटर प्रमाणे करण्यात येईल. हे वितरण शक्यतो रास्तभाव दुकान/किरकोळ केरोसिन परवानाधारकांमार्फत करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, विशिष्ट परिस्थितीत वेगळी कार्यपध्दती विहित करण्याची मुभा जिल्हा प्रशासनाला राहील. घाऊक केरोसिन विक्रेत्यांनी केरोसिनच्या नियमित नियतनाप्रमाणे तेल कंपन्यांच्या डेपोमध्ये किंमतीचा भरणा करुन या केरोसिनची उचल करावी. त्यामुळे उचल आणि वितरणाच्या नियमित पध्दतीत कोणताही बदल राहणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे (Free Kerosene To Cyclone Victims).

जिल्हा प्रशासनाने बाधित कुटुंबांना वितरित होणाऱ्या केरोसिनचा एक्स डेपो दरासह सर्व खर्च सुरुवातीला संबंधित केरोसिन विक्रेत्यांनी राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून करावा लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंब म्हणून निश्चित केलेल्या कुटुंबांनाच केरोसिनचे मोफत वितरण करण्यात यावे. अपात्र कुटुंबांना मोफत केरोसिनचे वितरण करु नये, असेही आदेश आहेत.

मंजूर करण्यात आलेले विनाअनुदानित दराचे केरोसिन जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळ बाधित म्हणून निश्चित केलेल्या कुटुंबांना आणि आवश्यक तेथे पात्र शिधापत्रिकाधारकांनाच होईल याची दक्षता घ्यावी. याबाबत संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी व्यक्तीश: जबाबदार राहतील. अपात्र कुटुंबांना अथवा अपात्र शिधापत्रिकाधारकांना वितरण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत (Free Kerosene To Cyclone Victims).

संबंधित बातम्या :

हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही, खांद्याला खांदा लावून काम करा : गिरीश महाजन

वादळग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देईन, रायगडच्या पाहणी दौऱ्यात आदिती तटकरेंची हमी

होम क्वारंटाईन कुणाला करावे, कोणाला नाही? वादळग्रस्त रायगडसाठी नियमावली

कपड्यांसाठी 1800, भांड्यांसाठी 2 हजार, घरांसाठी 95 हजार, वादळग्रस्तांसाठी उद्यापासून थेट मदत!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें