AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpari-Chinchwad Murder : पिंपरी-चिंचवडमध्ये मित्राने सिगारेट दिली नाही म्हणून कोयत्याने वार, हल्ल्यात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

विशेष म्हणजे दुसऱ्याच मुलाला मारण्याचा कट करण्यासाठी हे सर्व मित्र जमले होते. मात्र दारुच्या नशेत सिगरेटवरुन झालेल्या क्षुल्लक वादातून त्यांनी आपल्याच मित्राची हत्या केली.

Pimpari-Chinchwad Murder : पिंपरी-चिंचवडमध्ये मित्राने सिगारेट दिली नाही म्हणून कोयत्याने वार, हल्ल्यात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Jul 05, 2022 | 11:15 PM
Share

पिंपरी : मित्रांच्या दारु पार्टीत एका तरुणाने आपल्या 15 वर्षीय मित्राने सिगारेट (Cigarette) दिली नाही म्हणून कोयत्याने वार करुन त्याची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हत्येप्रकरणी पाच मुलांना पोलिसांनी ताब्यात (Detained) घेतले आहे. सुमित बनसोडे (15) असे मयत मुलाचे नाव आहे. विशेष म्हणजे दुसऱ्याच मुलाला मारण्याचा कट करण्यासाठी हे सर्व मित्र जमले होते. मात्र दारुच्या नशेत सिगरेटवरुन झालेल्या क्षुल्लक वादातून त्यांनी आपल्याच मित्राची हत्या केली. मुलगा घरी न पोहचल्याने आईने शोधाशोध करत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा उघडकीस आला.

दुसऱ्याच मुलाच्या हत्येचा कट रचला, पण सुमितवरच उलटला

सुमितच्या मित्राची कबुतरांची ढाबळ आहे. त्या ढाबळीत डुडुळगाव येथील एकजण येऊन गेल्याचा संशय सुमितला आणि त्याच्या मित्राला होता. संशयित मुलाकडे देखील कबुतरांची ढाबळ आहे. या संशयावरुन त्याला मारण्यासाठी सुमितच्या मित्राने त्याला इन्स्टाग्रामवर मॅसेज करुन बोलावले आणि संशयित तरुणाला मारण्याचा कट रचला. त्याप्रमाणे सोमवारी सकाळी सुमित आणि त्याचे सर्व मित्र जमले. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पाच ते सात मित्र एकत्र जमले. त्यानंतर ते सर्वजण मोशी येथील जुना जकात नाक्याजवळ असलेल्या जंगलात गेले. तेथे गेल्यानंतर सर्व मित्र दारु प्यायले आणि मोबाईलवर गाणी लावून नाचू लागले. यावेळी सुमितकडे असलेली सिगारेट त्याच्या एका मित्राने मागितली. मात्र त्याने सिगारेट देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने दोन मित्रांनी सुमितच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने सुमितचा मृत्यू झाला.

मित्राची कसून चौकशी केली असता हत्येची कबुली दिली

मयताची आई एका स्कूल बसवर अटेंडंट म्हणून काम करते. सोमवारी नेहमीप्रमाणे ती कामावरुन दुपारी 3 वाजता घरी आली. घरी आल्यानंतर मुलगा घरी नसल्याने तिने त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र तो कुठेही सापडला नाही. सुमितची हत्या झाली तेव्हा तेथे उपस्थित असलेला त्याचा एक मित्रही सोमवारी दिवसभर त्याच्या आईसोबत त्याचा शोध घेत होता. अखेर त्याची वाट पाहून दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी तिने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गाठत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. यानंतर भोसरी पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवत त्याचा शोध सुरु केला. यावेळी सुमितच्या आईसोबत त्याचा शोध घेणाऱ्या मित्राने पोलिसांना सुमित जुना जकात नाक्याजवळ एका झाडाखाली झोपल्याचे सांगितले. पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहिले असते तेथे सुमितचा मृतदेह आढळून आला. पोलिसांचा सुमितच्या मित्रावर संशय बळावल्याने त्याची कसून चौकशी केली असता हत्येचा गुन्हा उघड झाला. (Friends killed a boy for not giving him a cigarette in Pimpri-Chinchwad)

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.