AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : ‘दुसरीकडे गेल्यावर ती वेश्या हे असं बोलणं म्हणजे..’ राज ठाकरेंचे शब्द शिंदे सेनेच्या मनाला लागले, लगेच पलटवार

Eknath Shinde Shivsena : राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते फुटलेल्या खासदार, आमदारांवर बोलले. देहविक्रीला समजा हे तयारच असतील, तर गिऱ्हाईक आहेतच असं राज ठाकरे बोलले. या शब्दांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.

Shivsena : 'दुसरीकडे गेल्यावर ती वेश्या हे असं बोलणं म्हणजे..' राज ठाकरेंचे शब्द शिंदे सेनेच्या मनाला लागले, लगेच पलटवार
Raj Thackeray-Eknath Shinde
| Updated on: Jul 02, 2026 | 1:08 PM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आयोगाकडून मतदार यादीबद्दल जे सरचं काम सुरु झाला आहे. त्यासह खासदार, आमदार फुटीवर राज ठाकरे यांनी परखड शब्दात भाष्य केलं. राज ठाकरे जे बोलले ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पटलेलं नाही. राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले. त्यावर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. राज ठाकरे काल म्हणाले की, “प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीय, विकले जाणाऱ्यांचा आहे. देहविक्रीला समजा हे तयारच असतील, तर गिऱ्हाईक आहेतच. जे राजकारण चालू आहे ते खूप घाणेरडं आहे” त्याला उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, ‘राज ठाकरे यांनी काल कोणत्या आधारावर वक्तव्य केलं ते कळायला अर्थ नाही’

“तुमच्या पक्षात असेल तर वाघ आणि दुसरीकडे गेल्यावर ती वेश्या असं स्टेटमेंट करणं गैर आहे. पक्षांतर्गत मतभेद नाहीत का? तुमचं सर्व सहन कराव असा करार केलेला आहे का? पक्ष श्रेष्ठी वेळ देत नाहीत, दबूनच राहायचं काय? तुम्ही गद्दार , खोके घेतले म्हणतात. मात्र तुम्ही तुमच्याकडे कार्यकर्ते ठेवण्यात अपयशी ठरलात. भाजपची भूमिका काय येत्या काळात ठरेल” असं उत्तर संजय शिरसाट यांनी दिलं.

रोहित पवार पेक्षा अमोल कोल्हेंचे मत महत्वाचे

अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांच्या परस्पर विधानांवर संजय शिरसाट बोलले. “अमोल कोल्हे हे नेता आहेत, प्रवक्ते आहेत निश्चितच त्याला कुणीतरी सांगितले असेल. याचा अर्थ त्याला पक्षाच्या नेतृत्वाने सांगितले असेल. रोहित बोलतो ते पवारांचे मत असते. उलटी भूमिका घेणं हे पवारांचं नेहमीचच आहे. ऑफर आली तर जायचे हे ठरलेले आहे. रोहित पवार पेक्षा अमोल कोल्हेंचे मत महत्वाचे. बदलाचे वारे जेव्हा वाहतात तेव्हा अशा प्रकारे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जातात” असं संजय शिरसाट म्हणाले. उद्धव ठाकरे यांना आम्ही कधीही म्हटलेलं नाही की, तुम्ही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारा असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!