AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव आणि राज ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनीही एकत्र यावं; गजानन कीर्तिकरांचं मोठं विधान

गजानन कीर्तिकर यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी मोठं विधान केलं आहे. आता ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया...

उद्धव आणि राज ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनीही एकत्र यावं; गजानन कीर्तिकरांचं मोठं विधान
Gajanan KirtikarImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 07, 2025 | 3:18 PM
Share

कधीकाळी ठाकरे गटात महत्त्वाचं स्थान असलेले गजानन कीर्तिकर यांनी शिवसेना फुटीनंतर शिंदे गट जवळ केला. आता त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनीही एकत्र यावं असं मोठं विधान केलं आहे.

“एकनाथ शिंदे यांचीही शिवसेना एकत्र आली पाहिजे”

काँग्रेसची साथ उद्धव ठाकरेंनी सोडायलाच हवी. आणि राज ठाकरे भाजपसोबत गेलेच नाही कधी. भाजप विरहित, काँग्रेस विरहित शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे. तेवढे ते हुशार आहे. महाराष्ट्रातील जनतेमध्ये, कार्यकर्त्यांच्या मनात काय भावना आहे हे त्यांना माहीत आहे. एकत्र आल्यावर त्यांचं कॅडर काय ठरवतं. मतदारांना तर दोघे एकत्र यावं वाटतं. दोघांनी येऊन शिवसेना अभेद्य होणार नाही. एकनाथ शिंदे यांचीही शिवसेना एकत्र आली पाहिजे. ही शिवसेना असेल ती महाराष्ट्रातील निवडणुकीत मग लोकसभा असो किंवा विधानसभा असो यात ती सिकंदर होईल असे गजानन कीर्तिकर म्हणाले.

पुढे ते म्हणाले, मिठाचा खोडा अदृश्य शक्ती टाकत आहेत. मी त्यांचं नाव घेत नाही. शिवसेना एकसंघ व्हावी, म्हणजे भविष्यात आपल्याला धोका आहे. हा धोका ज्यांना वाटतो ते मिठाचा खडा टाकतात. मी त्यांचं नाव घेत नाही आता. अदृश्य आहे. मी आज नाव घेत नाही. अदृश्य शक्ती आहे. त्यांचे मनसुबे आहेत. पूर्ण ताकदीने आपण सत्तेत असावं. जेव्हा शिवसेना विभाजित राहिली तरच ते शक्य होईल. त्यामुळे शिवसेना एकत्र येऊ नये असे मनसुबे असणारच काही लोकांचे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना तळमळीनं सांगेल एकत्र या. तुम्ही दोघे तरी एकत्र या. भविष्यात एकनाथ शिंदे यांना सोबत आणण्याचा प्रयत्न करेल. ऐकणं न ऐकणं हे त्यांचं काम आहे. मी ज्येष्ठ आहे. त्यामुळे त्यांना मी बोलू शकतो असे ही ते म्हणाले.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.