AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुखाचे दिवस…! CM फडणवीस ते राज ठाकरे…जनतेला दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, कोण काय म्हणालं?

महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात आज अनेक राजकीय नेत्यांच्या घरातही गणरायाचे आगमन झालं आहे.

सुखाचे दिवस...! CM फडणवीस ते राज ठाकरे...जनतेला दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, कोण काय म्हणालं?
ganesh festival news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 14, 2026 | 10:48 AM
Share

राज्यभरात गणेशोस्तवाच्या उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक जण गणेशोत्वाच्या आनंदात गुंग झाले आहेत. भक्तांची गणरायाची मूर्ती आणण्यासाठी लगबग सुरू आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी गणेशोत्सवाचा सणाची रेलचेल पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील गणेशभत्तांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून राज ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या आहे. जनतेच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदो, अशी अनेकांमी गणपतीला प्रार्थना केली आहे.

राजकीय नेत्यांच्या सोशल मीडिया पोस्ट जशाच्या तशा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या प्रगतीची घोडदौड अविरत राहो, सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो, हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना! चला, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुया…श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा”. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे हे काही दिवसांआधी लंडन दौऱ्यवरून भारतात परतले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ‘विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या आगमनानं प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदो, शेतकऱ्यांच्या शिवारात भरघोस पीक येवो, कष्टकरी बांधवांच्या मेहनतीला यश मिळो आणि युवक-युवतींच्या स्वप्नांना नवी दिशा मिळो, हीच श्रींच्या चरणी प्रार्थना. गणेशोत्सव हा आपल्या श्रद्धेसोबतच सामाजिक एकोपा, लोकसहभाग आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेत, शिस्तीचं आणि पर्यावरणाचं भान ठेवत हा उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करूया. श्रीगणरायांच्या आशीर्वादानं महाराष्ट्राच्या प्रगतीची वाटचाल अधिक गतिमान व्हावी आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवी ऊर्जा मिळावी, अशी मनापासून प्रार्थना’.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटलं की, ‘सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. या शुभ दिनी तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर जावो. तसेच तुमचे आयुष्य आनंदी होवो, अशी प्रार्थना करतो’. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.  शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आनंद, उत्साह आणि भक्तीभावाच्या वातावरणात आज गणरायाचे आगमन होत आहे. चैतन्याने सळसळणारा गणेशोत्सव, आपण सर्वजण या उत्सवात सहभागी होऊन आनंदाची उधळण करुया. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा’.

Follow Us
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...