पाच नगरसेवकांची बंडखोरी, भाजपला धक्का; गणेश नाईक म्हणतात…

भीमराव गवळी, Tv9 मराठी

Updated on: Jan 07, 2021 | 4:21 PM

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई भाजपमध्ये बंडखोरी सुरू झाली आहे. (ganesh naik reaction on 5 corporator joins shivsena and ncp)

पाच नगरसेवकांची बंडखोरी, भाजपला धक्का; गणेश नाईक म्हणतात...

नवी मुंबई: ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई भाजपमध्ये बंडखोरी सुरू झाली आहे. नवी मुंबईतील आतापर्यंत पाच नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. हा भाजप नेते गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला धक्का असल्याचं मानलं जात असून त्यामुळे नाईक गोटात खळबळ उडाली आहे. नगरसेवकांच्या बंडखोरीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता असली तरी नाईक यांनी मात्र, जे गेले त्यांना शुभेच्छा, असं म्हणत या बंडखोरांना शुभेच्छा दिल्या आहेत. (ganesh naik reaction on 5 corporator joins shivsena and ncp)

भाजपमधील बंडखोरीनंतर आज पहिल्यांदाच गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर मौन सोडलं. जे पक्ष सोडून गेले त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. नव्या पक्षात दाखल झालेल्यांनी तिथे सुखाने नांदावे. नांदा सौख्य भरे, असं सांगतानाच मला नगरसेवकांनी सोडून जाणं हे नवीन नाही. ही आजची घटना नाही किंवा पहिल्यांदाच असं घडतंय असं नाही. 1995 पासून ही धरसोड सुरूच आहे, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपचा महापौर होईल

गेल्या 25 वर्षांपासून गणेश नाईकांच्या आवाहनाला जनतेने साथ दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमच्यावर जनता विश्वास टाकेल. भाजपचा महापौर निवडून देतील, याचा मला विश्वास आहे, असं नाईक म्हणाले. नवी मुंबई महापालिका तोंडावर आलेली असताना नाईकांना धक्का देत 5 नगरसेवक भाजपमधून बाहेर पडले आहेत. नाईक समर्थक असलेल्या या पाच नगरसेवकांपैकी तिघांनी शिवसेनेत तर दोघांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा नाईकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यातून नाईक कसे कम बॅक करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, नाईक यांनी आज महापालिका आयुक्तांची भेट घेऊन शहरातील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवकांनी नवी मुंबईतील विविध तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, शंकर मोरे, सायली शिंदे, दशरथ भगत आणि इतर नगरसेवक उपस्थित होते. (ganesh naik reaction on 5 corporator joins shivsena and ncp)

संबंधित बातम्या:

नवी मुंबईत महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी, राष्ट्रवादीच्या बैठका, भाजपला धक्का बसणार? स्पेशल रिपोर्ट

नवी मुंबईत धोकादायक इमारतीतील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, नववर्षात वाढीव FSI ची भेट

नवी मुंबईतील उद्यान घोटाळाप्रकरणी अधिकारी आणि कंत्राटदारावर निलंबनाची कारवाई

(ganesh naik reaction on 5 corporator joins shivsena and ncp)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI