AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपती बाप्पासोबत चुकून साडे पाच तोळ्याच्या सोनाच्या मुकूटाचंही विसर्जन!, 12 तासानंतर जीव भांड्यात

वसईतील पाटील कुटुंबाच्या दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन शनिवारी झालं. गणपती बाप्पाचं विसर्जन करताना चुकून साडे पाच तोळ्याच्या मुकूटाचंही विसर्जन झालं. काही वेळानंतर ही बाब पाटील कुटुंबाच्या लक्षात आली. त्यामुळे संपूर्ण पाटील कुटुंब चिंतेत पडलं. मात्र 12 तासांच्या शोधानंतर मुकूट सापडला.

गणपती बाप्पासोबत चुकून साडे पाच तोळ्याच्या सोनाच्या मुकूटाचंही विसर्जन!, 12 तासानंतर जीव भांड्यात
गणेशमूर्ती
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 2:40 PM
Share

वसई : गणपती बाप्पाच्या आगमनामुळे राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. काही जणांकडे दीड दिवस, काहींकडे 5 दिवस तर काहींकडे 10 दिवसांचा गणपती असतो. दीड दिवसाच्या गणपतीचं शनिवारी विसर्जन करण्यात आलं. वसईमध्येही एका कुटुंबाकडून दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. मात्र, विसर्जनानंतर हे संपूर्ण कुटुंब चिंतेत पडलं. कारणही तसंच होतं. मात्र, विघ्नहर्त्याने 12 तासांत या कुटुंबाची चिंता दूर केली. (Immersion of gold crown along with Ganapati idol)

त्याचं झालं असं की वसईतील पाटील कुटुंबाच्या दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन शनिवारी झालं. गणपती बाप्पाचं विसर्जन करताना चुकून साडे पाच तोळ्याच्या मुकूटाचंही विसर्जन झालं. काही वेळानंतर ही बाब पाटील कुटुंबाच्या लक्षात आली. त्यामुळे संपूर्ण पाटील कुटुंब चिंतेत पडलं. मात्र 12 तासांच्या शोधानंतर मुकूट सापडला आणि पाटील कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला.

12 तासांच्या शोधानंतर जीव भांड्यात

वसईमध्ये राहणाऱ्या पाटील कुटुंबानं दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती. मात्र, घरी सुतक पडल्यामुळे पाटील कुटुंबांने आपल्या पाच दिवसाच्या गणपतीचं दीड दिवसांतच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. विसर्जनावेळी ते गणपतीच्या डोक्यावरील सोन्याचा मुकूट काढायला विसरले. साडे पाच तोळ्याच्या मुकूटासह त्यांनी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. या मुकूटाची किंमत जवळपास तीन लाख रुपये होती. जवळपास 12 तास या मुकूटाचा शोध घेतल्यानंतर अखेर बाप्पाचा मुकूट सापडला. त्यानंतर पाटील कुटुंबाने सुटकेचा निश्वास घेतला.

गतवर्षीची नियमावली कायम

आगामी गणेशोत्सवसाठी मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक संपन्न झालीय. यात गतवर्षीची नियमावली कायम ठेवण्यात येणार आहे. गणेश दर्शनासाठी भाविकांना परवानगी द्यावी का याचा निर्णय पोलिसांसोबत चर्चा करून वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार आहे.

अशी असणार नियमावली?

? सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीच्या उंचीची मर्यादा 4 फूट राहणार

? घरगुती गणेशमूर्ती 2 फूट उंचीची असावी

? गर्दी होणार नाही याची काळजी गणेशमंडळांना घ्यावी लागणार

?84 नैसर्गिक गणेश विसर्जन ठिकाणांची निर्मिती

?विसर्जन ठिकाणी महापालिकेला मूर्ती द्यावी लागेल

?त्यानंतर महापालिका गणेश विसर्जन करणार आहे

?सार्वजनिक मूर्ती विसर्जनासाठी 10 कार्यकर्त्यांना परवानगी

?लहान मुले आणि ज्येष्ठांनी विसर्जनच्या ठिकाणी जाऊ नये

?ऑनलाईन दर्शनाची सोय करावी

?नागरिक देतील ती वर्गणी स्वीकारावी

? शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.

? सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत

? आरती, भजन, कीर्तन यादरम्यान होणारी गर्दी टाळावी.

? नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.

? गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी

इतर बातम्या :

मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकरांची थेट पोलिसात तक्रार

दरेकरांच्या ‘मुक्या’नं पक्षाची गोची? चंद्रकांत पाटील म्हणतात, त्यांच्या मनात अश्लिल अर्थ नव्हता!

Immersion of gold crown along with Ganapati idol

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.