मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकरांची थेट पोलिसात तक्रार

महाराष्ट्रात (Maharashtra) घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत, तक्रार दाखल केली आहे.

मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकरांची थेट पोलिसात तक्रार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप आमदार अतुल भातखळकर


मुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत, तक्रार दाखल केली आहे. कांदिवलीतील समता नगर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. या वक्तव्याने एक समाज भयभीत झालेला आहे. जर परप्रांतीय गुन्हेगार असतील तर शिवसेना नेते संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांतातून आले आहेत? मुख्यमंत्र्यांविरोधात कलम 154अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं अतुल भातखळकर यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला सामना या दैनिकात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे सामानाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे आणि कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं अतुल भातखळकर म्हणाले.

या राज्यात कायद्याचे राज्य नाही, त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र तीन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात जावू, असं भातखळकर म्हणाले.

भातखळकरांचं डोकं फिरलं : मनीषा कायंदे

अतुल भातखळकर यांचं डोकं फिरलं आहे. डोकं ठिकाणावर नाही. एखादा व्यक्ती कुठून आल्या त्याची नोंद नसावी का? पोलिसांना तपास करावा लागतो. पोलिसांना गुन्हेगाराची पार्श्वभूमीची नोंद घ्यावी लागते. यात काय चुकीचे बोलले मुख्यमंत्री? माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हीच भूमिका कित्येक वर्षांपूर्वी मांडली आहे, असं शिवसेना आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या.

केंद्राच्याही अशा सूचना आहेत, अनेक राज्यांना या सूचनेचे पालन करत कर्नाटक सरकार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात सरकार अशाच पद्धतीने नोंदी ठेवत आहेत. केंद्राच्या अनेक योजना आहेत, कामगारांच्या या योजनांसाठी अशा नोंदी ठेवाव्याच लागतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी किती मायग्रेट वर्कर अनेक राज्यातून आपापल्या घरी गेले त्याची नोंद झाली होती. भाजपवाले फ्रटेशनमध्ये आरोप करत आहे. त्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणं म्हणजे वेळ घालवण्यासारखा प्रकार आहे, असा हल्ला मनीषा कायंदे यांनी केला.

VIDEO : अतुल भातखळकर काय म्हणाले?

संबंधित बातम्या 

राज ठाकरेंची महत्त्वाची सूचना मान्य, ‘परप्रांतियांची नोंद ठेवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI