Ganpatipule: गणपतीपुळ्याला भाविक आणि पर्यटकांची गर्दी, MTDC मालामाल

गणपतीपुळ्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मालामाल झाली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)  मे महिन्यात एमटीडीसीला एका महिन्यात 1 कोटी 10 लाखांचे उत्पन्न मिळालंय. अत्तापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांधिक प्रतिसाद आहे.

Ganpatipule: गणपतीपुळ्याला भाविक आणि पर्यटकांची गर्दी, MTDC मालामाल
गणपतीपुळ्यात पर्यटकांचा उच्चांक
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 2:25 PM

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे (Ganptipule) अत्यंत सुंदर असं गणेश मंदिर. (Ganesh Temple) येथील गणेश मंदिरात श्री गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे आशी मान्यता आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक गणपतीपुळ्यात सुट्ट्या असल्याकी दाखल होत असतात. निसर्गसौदंर्याने नटलेलं गणपतीपुळे हे भाविकाचं आणि पर्यटकाचं फिरण्यासाठी अत्यंत आवडतं ठिकाण आहे. सुट्टया आल्या की इथे पर्यटकांची कायमच गर्दी होते. समुद्र किनाऱ्यालाच लागुन मंदिर असल्याने मंदिरात लाटांचा घनगंभीर आवाज, अथांग समुद्र, नजरेच्या टप्प्यात न मावणारा स्वच्छ सुंदर समुद्र किनारा. सुंदर, सुबक अत्यंत रेखीव असं गणेश मंदिर. असा विलक्षण अनुभव इथे मिळतो. यापरिसरात सागराची रूपं, कोकणातील निसर्गसौदंर्य अनुभवता येते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या अजून संपलेल्या नसल्याने येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली.

पर्यटकांची सर्वाधिक भेट

यंदाच्या मे महिन्यात गणपतीपुळ्यात पर्यटकांचा उच्चांक पहायला मिळाला. या एका महिन्यात गणपतीपुळ्याला 4 लाखाहून अधिक भाविकांनी भेट दिली आहे. निर्बंधमुक्त फिरता येत असल्यानं पर्यटक आणि भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं. गेली दोन वर्षे कोरोन निर्बंधामुळे फिरता येत नसल्याने यावर्षी पर्यंटक आणि भाविकांनी फिरण्याचा मनमुराद आनंद लुटला. स्थानिक व्यावसायिकांना पर्यटक वाढल्याने चांगलाच फायदा झाला. उत्पन्नात नफा मिळाला. गेली दोन वर्षे कोरोनामुळे भाविक आणि पर्यटकांची संख्या कमी झाल्याने त्यांच्या व्यवसायावर देखील त्याचा चांगलाच परिणाम पडला होता.वाढलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे येत्या काळात परिसराचा आणि व्यवसायाचा देखील अधिक चांगला विकास होण्याची अपेक्षा आहे.

हे सुद्धा वाचा

एमटीडीसी मालामाल (MTDC)

पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गणपतीपुळे येथे विविध दर्जेदार सुविधा गेल्या काही काळात निर्माण केल्या आहेत. कोरोनाच्या काळात दोन वर्षे सर्वंच ठिकाणच्या पर्यटनावर प्रतिकूल परिणाम झाला होता. धार्मिकबरोबरच पर्यटन स्थळ म्हणूनही गणपतीपुळेला पर्यटकांची कायमच अधिक पसंती असते. पर्यटकांची संख्या वाढल्याने गणपतीपुळ्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मालामाल झाली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)  मे महिन्यात एमटीडीसीला एका महिन्यात 1 कोटी 10 लाखांचे उत्पन्न मिळालंय. अत्तापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांधिक प्रतिसाद आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.