प्रवासाच्या 15 मिनिटं आधी वंदेभारतचं कन्फर्म तिकीट मिळवा, या स्टेप्स फॉलो करा
आता तुम्ही वंदेभारत ट्रेनचे तिकीट प्रवास सुरु होण्याआधी 15 मिनिटं आदी कन्फर्म करु शकणार आहे. ही सुविधा भारतीय रेल्वेने शेवटच्या क्षणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुरु केली आहे.

वंदेभारत ट्रेन अल्पावधीत लोकप्रिय ठरली आहे. या ट्रेनची तिकीटे तुम्ही ट्रेन सुटण्याच्या 15 मिनिटं आधी कन्फर्म बुक करु शकता. ही सुविधा भारतीय रेल्वेने शेवटच्या वेळेत प्रवास करताना प्रवाशांची सोय व्हावी म्हणून केली आहे. त्यामुळे ट्रेनच्या रिकामी आसनांचा योग्य उपयोग व्हावा यासाठी ही सोय केली आहे. ही सुविधा केवळ दक्षिण रेल्वे झोनच्या काही वंदेभारत ट्रेनमध्ये सुरु केली आहे. चला तर समजून घेऊया वंदेभारतची तिकीटे कशी बुक करायची आणि कोणत्या ट्रेनमध्ये ही सुविधा आहे हे पाहूयात..
कोणत्या ट्रेनचा समावेश आहे ?
ही सुविधा आता केवळ आठ वंदे भारत ट्रेनमध्ये उपलब्ध केली आहे. या ट्रेन तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात चालवण्यात येत आहेत. या ट्रेनचा या योजनेत समावेश आहे.
मंगळुरु सेंट्रल – तिरुवनंतपुरम सेंट्रल
तिरुवनंतपुरम सेंट्रल – मंगळुरु सेंट्रल
चेन्नई एग्मोर – नागरकोईल
नागरकोईल – चेन्नई एग्मोर
कोयंबटूर – बेंगलुरु कँट
मंगळुरु सेंट्रल – मडगांव
मदुरई – बंगळुरु कँट
डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रल – विजयवाडा
तिकीट बुक करण्याची सोपी पद्धत
वंदे भारत ट्रेनचे तिकीट ऑनलाइन बुक करणे खूपच सोपे आहे. खाली दिलेल्या टीप्सचा वापर करुन आपण सहज तिकीट बुक करुन आयत्यावेळी प्रवास करु शकतो.
आपल्या मोबाईल वा संगणकावरील www.irctc.co.in या वेबसाईटवर जा किंवा IRCTC Rail Connect हे App डाऊनलोड करा.
आपल्या IRCTC अकाऊंटमध्ये लॉग इन करा, जर अकाऊंट नसेल तर नवीन अकाऊंट बनवा
ज्या स्थानकातून बसायचे आहे किंवा उतरायचे आहे ते निवडावे. प्रवासाची तारीक आणि ट्रेनची निवड करावी
सिस्टम तुम्हाला रिकाम्या सीट दाखवेल
एक्झीकेटिव्ही क्लास वा चेअर कार पैकी एक निवडावे आणि आणि बोर्डींग स्टेशन टाकावे
ऑनलाईन पेमेंट करावे (उदा. UPI, कार्ड वा नेट बँकींग).तिकीट लगेच तुम्हाला SMS आणि ई-मेलवर मिळेल
या सुविधेचे फायदे
जर अचानक प्रवास करायचा असेल तर आता वेटलिस्टची गरज नाही. रिकाम्या सिट वाया जाणार नाहीत. शेवटच्या मिनिटाला तिकीट बुक होईल. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. सध्या ही सुविधा दक्षिण रेल्वेच्या आठ ट्रेनसाठी आहेत. नंतर यात आणखी काही ट्रेनचा समावेश होऊ शकतो. सामान्य तिकीटाचे दरच यासेवेसाठी लागू असतील.परंतू रेल्वेच्या नियमांनुसार कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागेल. ही सुविधा प्रवाशांसाठी अत्यंत उपयोगी आहे. ज्यांना अचानक प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना वरदान साबित होणार आहे.
