Girish kuber : याआधी शेतकरी आणि या लिखानामुळे कुबेर वादात, काय होती प्रकरणं? वाचा सविस्तर

आधीही अनेकदा गिरीश कुबेर वादात सापडले आहे. 

Girish kuber : याआधी शेतकरी आणि या लिखानामुळे कुबेर वादात, काय होती प्रकरणं? वाचा सविस्तर
पुण्यात भाजप युवा मोर्चाची गिरीश कुबेर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

मुंबई : गिरीश कुबेर यांच्यावर नाशिकमध्ये शाईफेक झाल्यानंतर त्यांच्या वादग्रस्त लिखानाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह लिखान केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक केली आहे. या शाईफेकीप्रकरणी दोन संशयितांना ताब्यातही घेण्याात आले आहे. अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. मात्र गिरीश कुबेरांची वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. आधीही अनेकदा गिरीश कुबेर वादात सापडले आहे.

गिरीश कुबेरांचा परिचय आणि त्यांचे वाद 

  1. गिरीश कुबेर लोकसत्ताचे संपादक
  2. जागतिक अर्थकारण, तेलाच्या राजकारणाचा दांडगा अभ्यास
  3. कुबेरांनी लिहिलेले अनेक लेख वादाच्या भोवऱ्यात
  4. बळीराजाची बोगस बोंब या अग्रलेखाने वादात सापडले
  5. असंताचे संत हा अग्रलेखही वादात, कुबेरांवर टीका
  6. लोकांच्या रोषानंतर हा अग्रलेख मागे घेतला
  7. आता रेनिसान्स स्टेट पुस्तकावरून वादात
  8. भाजपकडून या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी
  9. कुबेरांनी माफी मागवी अशी काँग्रेसची मागणी
  10. अमोल कोल्हेंकडून आक्षेपार्ह भाग वगळण्याची मागणी

शाईफेक आणि कुबेरांवर तीव्र प्रतिक्रिया

नाशिकमधील शाईफेकीच्या प्रकरणावर आणि कुबेरांच्या लिखानावर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी शाईफेकीचं समर्थन केलं आहे, तर काहींनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. गिरीश कुबेरांविरोधात मराठा संघटनाही आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. शाईफेकीच्या प्रकारनंतर गिरीश कुबेरांनी मीडियाशी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कुबेरांची अधिकृत भूमिका अजून समोर आली नाही. साहित्य संमेलनाची आज सांगता आहे आणि शेवटच्या दिवशी हा प्रकार घडल्यानं पुन्हा जोरदार वादळ उठले आहे.

Gulabrao Patil | जळगावात मुलींचे प्रमाण चिंताजनक, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली खंत

कुबेरांच्या ‘रेनेसान्स स्टेट: द रिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर बंदी घाला; संभाजी ब्रिगेडची पुन्हा मागणी

मविआने खुल्या प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणाच्या जागा मागासवर्गीय उमेदवारांना विकल्या, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप

Published On - 5:43 pm, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI