AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girish Mahajan : म्हणूनच शिवसेनेला डबक्यातला पक्ष बोललो, गिरीश महाजनांनी स्पष्टच केलं, तर खडसेंवरही जोरदार पलटवार

भाजप हा समुद्र आहे तर शिवसेना हे डबकं असून डबक्यातल्या बेडूक असल्याचं बोललो होतो असं भाजप नेते गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. भाजप नेते एकनात खडसे आणि गिरीश महाजन हेही अशा वेळी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

Girish Mahajan : म्हणूनच शिवसेनेला डबक्यातला पक्ष बोललो, गिरीश महाजनांनी स्पष्टच केलं, तर खडसेंवरही जोरदार पलटवार
म्हणूनच शिवसेनेला डबक्यातला पक्ष बोललो, गिरीश महाजनांनी स्पष्टच केलं, तर खडसेंवरही जोरदार पलटवार
| Edited By: | Updated on: May 15, 2022 | 10:39 PM
Share

जळगाव : राज्यात सध्या राजकीय खडाजंगी सुरू असतान जळगावचं राजकारण शांत राहिल असे होणारच नाही, तिकडे जळगावच्या राजकारणही गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पुन्हा शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. शिवसेना हा पक्ष महाराष्ट्र पुरताच मर्यादित आहे. भाजपशिवाय शिवसेनेचं राज्यात कुठल्याही अस्तित्व नाही. भाजपसोबत (BJP) युती होती म्हणूनच सेनेचे राज्यात 54 आमदार निवडून आले. आता शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवून 4 खासदार तरी निवडून दाखवावे, असे आव्हान देत त्यामुळेच भाजप हा समुद्र आहे तर शिवसेना हे डबकं असून डबक्यातल्या बेडूक असल्याचं बोललो होतो असं भाजप नेते गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. भाजप नेते एकनात खडसे आणि गिरीश महाजन हेही अशा वेळी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

मुख्यमंत्र्यांचं व्हिजन अस्पष्ट

एकमेकांवर टीका करणं कुरघोड्या करणं एवढंच या सरकारचं काम आहे कालच्या भाषणातून स्पष्ट झालं आहे. या भाषणात नशेत किरणं विद्यार्थी अशा कोणत्याच मुद्द्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचं काहीही तसेच कुठल्याही पध्दतीच व्हिजन नसल्याचं किंवा ते बोलले नसल्याचेही यावेळी गिरीश महाजन म्हणाले.

खडसेंची आधी त्यांचं पाहवं

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की एकनाथ खडसेंनी त्यांचं त्यांचं पाहावं. शिवसेना व भाजपमध्ये बोलू नये. आमचं आणि सेनेचा काय आहे ते आम्ही निपटून घेऊ. याबद्दल खडसेंना काही एक बोलण्याचा अधिकार नाही आम्ही आमचं काय ते बघून घेऊ अशा टोलाही गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना लगावला आहे .

महाराष्ट्रता हे काय होतंय?

काही दिवसांपूर्वीच एमआयएमचे नेते अबरुद्दीन ओवैसी हे महाराष्ट्रता आले, औरंगाबादेत त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली. त्यावरूनही भाजप आक्रमक झाली आहे. भाजपकडून याच मुद्द्यावरून चौफेर टीका होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा दुश्मन औरंगजेब याच्या कबरीवर फुल चढवली जाताहेत, वंदन केल जातय ही बाब पुरोगामी महाराष्ट्रासाठी शोभणारे नाही. यातून समाजा समाजामध्ये तेढ लावण्याचं काम सुरू असल्याची टीकाही यावेळी भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली. जेव्हापासून ओवैसी येऊन गेलेत तेव्हापासून  आजपर्यंत यावर जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून सरकारवरही जोरदार टीका होत आहे.

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.