AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिरीश महाजन यांनी भर कार्यक्रमात थेट सुरू केला डान्स, त्यानंतर प्रीतम मुंडे यांनी केलं असं काही…, video ची जोरदार चर्चा

एका कार्यक्रमामध्ये गिरीश महाजन यांनी गाण्यावर ठेका धरल्याचं पहायला मिळालं, दरम्यान या कार्यक्रमाला भागवत कराड, आणि प्रीतम मुंडे यांची देखील उपस्थिती होती. याच कार्यक्रमातील एक व्हिडीओ आता समोर आला आहे.

गिरीश महाजन यांनी भर कार्यक्रमात थेट सुरू केला डान्स, त्यानंतर प्रीतम मुंडे यांनी केलं असं काही..., video ची जोरदार चर्चा
Girish Mahajan danc Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 17, 2026 | 10:04 AM
Share

भाजप नेते गिरीश महाजन हे कायमच चर्चेत असतात. गिरीश महाजन यांच्या उत्साही आणि बिनधास्त स्वभावाची देखील चर्चा रंगते. पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला आहे. भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन, भाजपच्या माजी खासदार प्रीतम मुंडे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड असे भाजपचे बडे नेते सहभागी झाले होते. या कार्यक्रमात एका गाण्यावर गिरीश महाजन यांनी ठेका धरला, डान्स करायला सुरुवात केली. दरम्यान गिरीश महाजन यांनी स्टेजवर डान्स सुरू करताच माजी खासदार प्रीतम मुंडे या तात्काळ अंतर राखत बाजूला सरकल्याचं पहायला मिळालं. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

एक व्हिडीओ समोर आला आहे, भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाचा हा व्हिडीओ आहे. या कार्यक्रमामध्ये भाजपचे बडे नेते सहभागी झाले होते. त्यामध्ये मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, तसेच माजी खासदार प्रीतम मुंडे यांचा समावेश होता. दरम्यान या कार्यक्रमात एका गाण्यावर गिरीश महाजन यांनी चांगलाच ठेका धरला, दरम्यान गिरीश महाजन यांचा डान्स सुरू होताच, माजी खासदार प्रीतम मुंडे या तात्काळ अंतर राखत बाजूला सरकल्याचं पहायला मिळालं, या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

भाजपचे ‘संकट’मोचक

दरम्यान भाजपचे संकट मोचक अशी गिरीश महाजन यांची ओळख आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आणि विश्वासू म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत फडणवीस यांनी त्याच्यांवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. त्यामध्ये तोडागा काढण्यात महाजन यांना यश देखील मिळालं आहे. मात्र काही प्रसंगी महाजन हे वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले आहेत, विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा देखील प्रयत्न झाला. नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, या कुंभमेळ्याची संपूर्ण जबाबदारी ही गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. गिरीश महाजन हे कुंभ मंत्री आहेत.

Follow Us
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...