AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून नाथाभाऊंचं स्वागत करू; गिरीश महाजन यांची अत्यंत खोचक टीका

लोकसभा निवडणुका झाल्या तरी आमदार एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. आपला भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचं खडसे सांगत होते. पण भाजपने त्यांना अजून आपलसं केलं नाही. त्यामुळे मी राष्ट्रवादीतच असल्याचं खडसे म्हणत आहेत. तर दुसरीकडे खडसेंचा निर्णय दिवाळीनंतर होईल असं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंना टोला लगावला आहे.

दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून नाथाभाऊंचं स्वागत करू; गिरीश महाजन यांची अत्यंत खोचक टीका
भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंना टोला लगावला आहे.
| Updated on: Sep 14, 2024 | 3:02 PM
Share

आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये आहेत की राष्ट्रवादीत हे अजून स्पष्ट झालेलं नाही. आधी भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगणारे खडसे आता अचानक शरद पवार गटातच आपण आहोत असं सांगत आहेत. त्यामुळे संभ्रम अधिकच वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलं आहे. एकनाथ खडसे यांच्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर घेण्यात येणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून आम्ही नाथाभाऊंचं स्वागत करू, अशी खोचक आणि बोचरी टीका भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

एकनाथ खडसे यांचा दिवाळीनंतर भाजप पक्षप्रवेश होत असेल तर आम्ही फटाके फोडून त्यांचे स्वागत करू. दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून एकनाथ खडसेंचे आम्ही स्वागत करू. देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशा बाबत सांगत आहे तर मग कोणाचा विरोध राहील? खडसे भाजपमध्ये येणार म्हटल्यावर थोडे जास्तीचे फटाके आम्ही घेऊन ठेवू. दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून एकनाथ खडसेंचे आम्ही स्वागत करू, अशी टीकाच गिरीश महाजन यांनी केली आहे.

विरोधकांकडून विपर्यास

जिल्ह्यातील रस्ते गलिच्छ असल्याने ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यावरही गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ग्रामस्थांचा कुठलाही रोष नाही. लिही तांडा या ठिकाणी सरपंचांच्या घरी जाताना गाडी जात नसल्याने कार्यकर्त्याच्या दुचाकीवर गेलो. काही ठिकाणी रस्ते तुंबलेले होते. त्याचं काम करून घेण्यास मी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. पण त्याचा विपर्यास केला गेला. पावसाळा आहे, गावात कामं सुरू आहेत आणि सर्व कामे मंजूर आहेत. खोलगट भागात पाणी साचल्याने त्यातून आम्ही गाडी टाकली, एवढाच हा विषय आहे. मात्र विरोधकांनी त्याचा फार विपर्यास केला आहे, असं महाजन म्हणाले.

घोडा मैदान जवळ आहे

पावसाळा असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी थांबलेलं होतं. मात्र काही ठिकाणी काम राहून गेलं असेल तर ते काम करण्याची जबाबदारी माझी आहे. झालेल्या प्रकाराचा बाऊ करायचा, मला वाटतं विरोधक हतबल झालेले आहेत, असं साांगतानाच आता घोडा मैदान समोर आहे विरोधकांनी ताकतीने लढावं. मी सहा वेळा आमदार झालेलो आहे. आता कुणाला भाजपाचं तिकीट मिळेल त्याच्याविरुद्ध तुम्ही लढा, असंही ते म्हणाले.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी