पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांची विमानतळावरच गुप्तगू, काय झाली चर्चा

| Updated on: Nov 05, 2023 | 11:35 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात विमानतळावरच गुप्तगू झाली. गोदिंया विमानतळावर ही भेट झाली. सध्या पाच राज्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्रात वातावरण तापलेले आहे. अशा वेळी या भेटीला महत्व आले आहे. या दोघांमध्ये काय झाली चर्चा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांची विमानतळावरच गुप्तगू, काय झाली चर्चा
Follow us on

शाहिद पठाण, गोंदिया | 5 नोव्हेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात भेट झाली. सध्या पाच राज्यातील निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पंतप्रधान मध्यप्रदेशातील शिवनी जिल्ह्यात प्रचारारासाठी जात आहेत. त्यासाठी गोदिंया विमानतळावर त्यांचे आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे बिरसी विमानतळावर स्वागत केले. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा रंगली. राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा, तीन पक्षांतील समन्वय, देशातील लोकसभा आणि राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे. या भेटीदरम्यान दोन नेत्यांमध्ये याविषयावर तर हितगुज झाले नसेल ना?

अजित पवार आजारी

अजित पवार हे सध्या आजारी आहेत. त्यामुळे अनेक बैठका आणि कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती जाणवत आहे. मराठा आंदोलन काळात त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. त्यावरुन राज्यात चर्चांना उधाण पण आले. आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदान सुरु आहे. काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार यांची आई आणि पत्नी यांनी मतदान केले. पण अजित पवार आजारपणामुळे मतदान करणार नसल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवार डोळ्यादेखत मुख्यमंत्री व्हावे

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यावर तीन ही पक्षाच्या नेत्यांनी मत व्यक्त केली. खुद्द अजित पवार यांनी या चर्चांना विराम दिला. मुख्यमंत्री होण्यासाठी बहुमताचा आकडा लागतो, असे झणझणीत अंजन त्यांनी कार्यकर्त्यांच्या डोळ्यात घातले. पण त्यांच्या कुटुंबातूनही हिच मागणी समोर आली आहे. आपल्या डोळ्यादेखत अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा त्यांच्या आईने आज व्यक्त केली. काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानासाठी आल्या असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी हा संवाद साधला.

पंतप्रधान प्रचारासाठी रवाना


पंतप्रधान मध्यप्रदेशातील शिवनी जिल्ह्यात प्रचारासाठी रवाना झाले. गोंदिया येथील बिरसी विमानतळावर त्यांचे आगमन झाले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल, भाजपचे खासदार सुनील मेंढे, अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी त्यांचे स्वागत केले. पटेल आणि मोदी यांच्यात चर्चा झाली. या चर्चेचा तपशील मात्र समोर आला नाही.