नागझिऱ्यात सोडलेली वाघीण गोंदिया शहराजवळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभाग किती लक्ष ठेवणार?

नागझिऱ्यातील कोअर झोन गावाला लागून आहेत. वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे कोअर झोनशेजारील लोकं परेशान आहेत. रोज वन्यप्राणी गावात येतात.

नागझिऱ्यात सोडलेली वाघीण गोंदिया शहराजवळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभाग किती लक्ष ठेवणार?
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 9:47 PM

शाहिद पठाण, प्रतिनिधी, गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी जंगलातून दोन वाघिणी सोडण्यात आल्या होत्या. त्या सोडलेल्या दोन वाघिणीपैंकी एक वाघीण ही प्रकल्पात भटकंती करत आहे. गोंदिया शहराजवळ असलेल्या पांगळी जलाशय जंगल परिसरात वाघीण आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पांगडी येथील जंगल परिसरातील मार्ग पर्यटकांसाठी सध्या बंद करण्यात आले आहेत. तर ठिकठिकाणी वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जीपीएसद्वारे त्या वाघिणींवर वन विभाग नजर ठेवून आहे.

गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि वाघिणींची संख्या सम करण्याच्या उद्देशाने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात दोन वाघिणी आणण्यात आल्या. या दोन्ही वाघिणींना 20 मे रोजी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते. सोडलेल्या दोन वाघिणींपैकी एक वाघीण हे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील परिसरातून बाहेर निघाली. तिने आपला मोर्चा गोंदिया शहराजवळ असलेल्या पांगळी जंगलात वळविला.

या मार्गावरील वाहतूक बंद

सध्या काही दिवसांपासून पांगळी जलाशय आणि जंगल परिसरात त्या वाघिणी आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा पांगळी परिसरात तैनात केला आहे. तर पांगळी, आसलपणी, धानुटोलाच्या दिशेने येणाऱ्या सर्व मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिसरातील सर्व गावांतील नागरिकांना सुरक्षेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाघीण दिसताच वन विभागाला त्याची माहिती देण्याचे आवाहन देखील वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

वाघिणीकरिता नवेगाव-नागझिरा जंगल हे नवीन आहे. त्यामुळे सध्या आपल्या वास्तव्यासाठी जागा शोधत आहेत. कोणत्या परिसरात आपल्याला योग्य ते शिकार मिळेल, या दृष्टीने प्रयत्न करीत असल्याचे वनविभागाद्वारे सांगण्यात आले.

वाघिणीवर लक्ष किती ठेवणार?

असे असले तरी मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. पांगळी गावापासून गोंदिया शहर काही अंतरावरच असल्याने शहरात वाघीण येणार तर नाही अशी भीती नागरिकांमध्ये आहे. वाघिणीवर नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने वनविभाग लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी जागृत राहण्याच्या आणि वन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र सदगीर यांनी केले आहे.

गोंदिया येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलेल्या दोन्ही वाघिणींना कॉलर आयडी लावण्यात आले आहे. त्यामुळे गोंदियाकडे आलेली वाघीण सध्या वनविभागद्वारे नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने या वाघिणीवर लक्ष ठेवून आहे. कॉलर आयडी लावल्याने वाघिणी कुठे जात आहे. सध्या कुठे आहे.

या कॉलर आयडीद्वारे वन विभागाला माहिती मिळत आहे. त्यामुळे गोंदियाकडे आलेल्या वाघिणीवर वन विभाग नजर ठेवत आहे. वाघीण आणि गावकरी यांना धोका नसल्याचे देखील वनविभागद्वारे बोलले जात आहे. पांगळी परिसरात पर्यटक येत असल्याने पर्यटकांना जंगल परिसरात जाण्यास मनाई करण्यात आले आहे.

नागझिऱ्यातील कोअर झोन गावाला लागून आहेत. वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे कोअर झोनशेजारील लोकं परेशान आहेत. रोज वन्यप्राणी गावात येतात. त्यामुळे आता आम्ही कुठं जाणार असा प्रश्न कोअरशेजारील नागरिक विचारत आहेत.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.