AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रासाठी मोठी गुडन्यूज, दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल, बैठकीला सुरुवात

मोठी बातमी समोर येत आहे. अखेर केंद्राचे दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठीचे पथक मुंबईमध्ये दाखल झालं आहे. राज्याचे मुख्यसचिव राजेश अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक सुरू झाली आहे.

महाराष्ट्रासाठी मोठी गुडन्यूज, दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल, बैठकीला सुरुवात
दुष्काळ पहाणी दौऱ्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 08, 2026 | 6:45 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. अखेर केंद्राचे दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठीचे पथक मुंबईमध्ये दाखल झालं आहे. राज्याचे मुख्यसचिव राजेश अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक सुरू झाली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील दुष्काळ परिस्थितीची माहिती मुख्यसचिवांकडून अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. या पथकामध्ये एकून 33 जणांचा समावेश आहे. 11 सदस्यांचे 3 पथकं करण्यात आले असून, एक पथक दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात जाणार आहे. दुसरे पथक मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्याची पाहणी करणार आहे. तर तिसरे पथक विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि लगतच्या टंचाईग्रस्त भागांची पाहणी करणार आहे.

राज्यात यंदा एलनिनोमुळे पाऊसच झाला नाही, सुरुवातीला दीड महिना जूनचा अर्धा महिना आणि जुलैचा संपूर्ण एक महिला राज्यात चांगला पाऊस पडला, मात्र त्यानंतर पावसात जो खंड पडला त्यानंतर पाऊसच झाला नाही. संपूर्ण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना कोरडा गेल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. खरीप हंगाम हातचा गेला, पाऊस नसल्यामुळे आता रब्बी हंगाम देखील संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच राज्यातील 265  जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता शेतकऱ्यांचे डोळे हे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. सरकारकडून दुष्काळी भागात विविध उपाय योजना राबवण्यात येणार आहेत, ज्यामध्ये अन्न-धान्याची व्यवस्था, नुकसान भरपाई, जनावरांना चाऱ्याची सोय यातोबतच पाण्याची व्यवस्था अशा उपाय योजना राबवल्या जाणार आहेत. दरम्यान त्यानंतर आता केंद्रीय पथक देखील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी राज्यात दाखल झालं आहे. केंद्राकडून देखील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्याला भरीव मदत केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...