AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Obc reservation : सरकारच्या नौटंकीचा पर्दाफाश, शकूनी काकाच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार-पडळकर

भाजप नेते आणि ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी तर सरकारला शकूनी काकाच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार म्हटले आहे.

Obc reservation : सरकारच्या नौटंकीचा पर्दाफाश, शकूनी काकाच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार-पडळकर
गोपीचंद पडळकर
| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 4:31 PM
Share

सांगली : आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर भाजप नेते आणि ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी तर सरकारला शकूनी काकाच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार म्हटले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा जोरदार खडाखडी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजप पुन्हा आरक्षणावरून आमनेसामने आल्याचं पहायला मिळत आहे.

सरकारच्या नौटंंकीचा पर्दाफाश

आजच्या सर्वोच न्यायलयाच्या निर्णयामुळे प्रस्थापितांच्या संपूर्ण नौटंकीचा बहुजनांपुढे फर्दाफाश झाला आहे. अशी खरमरीत टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. अध्यादेश काढण्यापूर्वी इंपेरिकल डेटा गोळ करा आणि मगच अध्यादेश काढा असे वारंवार सांगितले होते. पण प्रस्थापितांना आपल्या उमेदवारांसाठी मार्ग मोकळा करायचा होता आणि म्हणूनच त्यांनी नावापुरता अध्य़ादेश काढला. असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

शकूनी काकाच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार

सुरवातीपासून प्रस्थापितांकडून ओबीसींचा पुळका असल्याचा आव आणला जातोय. वेळ असताना जर आयोगाला बसायला खुर्ची दिली असती, मानधन दिले असते तर आज आमच्या बहुजनांचे हक्क हिरावले गेले नसते. मी सर्व बहुजनांना आव्हान करतो, आपला हक्क घेतल्याशिवाय मिळाणार नाही, असे आवाहनही त्यांनी ओबीसी समाजाला केले आहे. जोपर्यंत शकुनी काकाच्या इशाऱ्यावर हे प्रस्थापितांचं सरकार चालतंय तोपर्यंत हे फक्त असे दाखवण्यापुरते नाटक करून तोंडाला पानं पुसण्याचं काम करतील. असा नाव न घेता पडळकरांनी शरद पवार यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आरक्षणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. आरक्षणासाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेत नवी घोषणा, कुणाला मिळणार लाभ, काय आहेत फायदे ? जाणून घ्या

Video: मुंबई पोलिसांचं दर्यादिली पाहून नेटकरी भारावले, म्हणाले, मुंबई पोलीस बेस्ट आहेत!

Miss India World 21 : जाणून घ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या भारतीय महिलेविषयी…

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.