AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: मुंबई पोलिसांचं दर्यादिली पाहून नेटकरी भारावले, म्हणाले, मुंबई पोलीस बेस्ट आहेत!

व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला मुंबईचा गजबजलेला रस्ता दिसत आहे. काही क्षणांनंतर, या क्लिपमध्ये एक पोलीस कर्मचारी दिव्यांग व्यक्तीचा हात धरून त्याला रस्ता ओलांडण्यास मदत करताना दिसतो.

Video: मुंबई पोलिसांचं दर्यादिली पाहून नेटकरी भारावले, म्हणाले, मुंबई पोलीस बेस्ट आहेत!
मुंबई पोलिसांकडून दिव्यांगाला रस्ता ओलांडून दिला
| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 4:13 PM
Share

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, त्यातील काही तुम्हाला हसवतात तर काही तुमच्या डोळ्यात पाणी आणतात. सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या पोस्ट्स तुम्ही सर्वजण अनेकदा पाहत असाल. मुंबई पोलीस अनेकदा त्यांच्या पोस्टद्वारे लोकांना विविध सुरक्षा नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांची आठवण करून देत असतात. अनेक वेळा ते लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने पोस्टही शेअर करतात. सध्या त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे जो खूप सुंदर आहे. व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी एका वेगळ्या दिव्यांग व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास मदत करताना दिसत आहे. (Viral Video of Mumbai Policeman Help to Handicap Person people says mumbai police are best)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, लोक या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हा व्हिडिओ पोलिसांनी त्यांच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर मुंबई पोलिसांच्या पेजवर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, #MrMumbaiPolice चे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवत असताना कर्तव्यदक्ष पोलीस! पो.ह. राजेंद्र सोनवणे वाहतूक नियमनादरम्यान एका दिव्यांग नागरिकाची मदत करत असतानाची चित्रफीत. या पोस्टखाली #MumbaiPoliceForAll हा हॅशटॅग देखील जोडला.

व्हायरल व्हिडीओ:

व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला मुंबईचा गजबजलेला रस्ता दिसत आहे. काही क्षणांनंतर, या क्लिपमध्ये एक पोलीस कर्मचारी दिव्यांग व्यक्तीचा हात धरून त्याला रस्ता ओलांडण्यास मदत करताना दिसतो. पार्श्वभूमीत व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती “हॅट्स ऑफ” म्हणताना देखील ऐकू येते. हा व्हिडीओ सर्वांचेच डोळे पाणावत आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट्स पाहिल्या गेल्या आहेत आणि त्याची संख्या अजूनही वाढत आहे.

या व्हिडिओवरील लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना, एका युजरने कमेंट केली आणि लिहिले क, मुंबई पोलिस ‘बेस्ट’ आहेत!!!!” दुसऱ्याने लिहिले, “आमचा मुंबई पोलिसांना सलाम. तिसर्‍याने लिहिले, अप्रतिम व्हिडिओ, असा व्हिडीओ तो क्वचितच पाहयला मिळतो. दुसर्‍याने लिहिले, मुंबई पोलीस नंबर वन. लोक या व्हिडिओवर हार्ट इमोटिकॉन देखील शेअर करत आहेत.

हेही पाहा:

Video: चिमुरड्यांना पाठीवर उचलून रस्त्याच्या कडेला पोहचवलं, नेटकरी म्हणाले, भाऊ असावा तर असा!

Video: सिंहासमोर चिंपाझींच्या पिलांना सोडलं, त्यानंतर जे झालं, त्याने नेटकरी हसून लोटपोट!

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.