महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2021 : निकालाचा पहिला मान कोल्हापुरात, पाडळीवर जनसुराज्यचा विजय

कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाने बाजी मारली असून गोराई ग्राम विकास आघाडीच्या 11 जागा निवडून आल्या आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:00 AM, 18 Jan 2021
महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2021 : निकालाचा पहिला मान कोल्हापुरात, पाडळीवर जनसुराज्यचा विजय

कोल्हापूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाने बाजी मारली असून गोराई ग्राम विकास आघाडीच्या 11 जागा निवडून आल्या आहेत. यामुळे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला असून हातकणंगले तालुक्यातील पहिल्या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. (Gram Panchayat Election Results 2021 Jansurajya Party wins over Padli Gram Panchayat in kolhapur)

राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल (Maharashtra Gram Panchayat Election Result) आज (सोमवार) लागणार आहे. कुठे सकाळी 8 वाजल्या 10 वाजल्यापासून निकालाला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सगळ्यांचंच या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे. काही मिनिटांवर निकाल असल्याने उमेदवारांची ‘दिल की धडकन तेज’ झाली आहे असंच म्हणायला हवं.

हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला लवकर सुरुवात झाली. या ठिकाणी कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मतदान अधिकारी व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मतदानाचा निकाल ऐकण्यासाठी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यात कार्यालयासमोर मोठी गर्दी केली आहे.

दरम्यान, राज्यातील 12,711 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीतून एकूण 2 लाख 14 हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८० टक्के मतदान झाले. एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 1523 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात 26,178 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण 46,921 प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली. ग्रामपंचायतींची निवडणूक ही पक्षीय पातळीवर किंवा पक्षांच्या चिन्हावर लढविली गेली नसली तरी राजकीय नेत्यांना आपला पाया भक्कम करण्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या असतात. (Gram Panchayat Election Results 2021 Jansurajya Party wins over Padli Gram Panchayat in kolhapur)

संबंधित बातम्या – 

Gram Panchayat Election Results 2021: काही क्षणांवर ग्रामपंचायतीचा निकाल, उमेदवारांची ‘दिल की धडकन तेज’!

Gram Panchayat Election Results 2021: गावगाड्यावर कुणाची सत्ता, कोण होणार पायउतार? थोड्याच वेळात निकाल

(Gram Panchayat Election Results 2021 Jansurajya Party wins over Padli Gram Panchayat in kolhapur)