अस्वलाच्या हल्ल्यात ग्रामपंचायत कर्मचारी जखमी; कोल्हापूर जिल्ह्यातील घटना; चंदगड तालुक्यात हत्ती, गवे, बिबट्यानंतर आता पुन्हा अस्वलांचा वावर

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात हत्ती, गवे, बिबट्या आणि त्यानंतर आता अस्वलांचा वावर वाढल्याने चंदगड तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करण्यात येत असून आता लोकांवर हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अस्वलाच्या हल्ल्यात ग्रामपंचायत कर्मचारी जखमी; कोल्हापूर जिल्ह्यातील घटना; चंदगड तालुक्यात हत्ती, गवे, बिबट्यानंतर आता पुन्हा अस्वलांचा वावर
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 7:47 PM

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामधील जंगमहट्टी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यावर मंगळवारी सकाळी अस्वलाने (Bear) हल्ला (Attack) केल्याने तो जखमी झाला आहे. तानाजी मानू शेळके हे जंगमहट्टी ग्रामपंचायतीमध्ये (Jangamhatti Gram Panchayat) कर्मचारी आहेत ते ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीची देखभाल करण्यासाठी गेले होते. मंगळवारी सकाळी ते गावाजवळ असणाऱ्या गायरानात टाकीतील पाणी पातळी पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्या झुडपात बसलेल्या अस्वलाने तानाजी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमा झाले असले तरी त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. त्यांना घातलेल्या जॅकेटमुळे त्यांच्या शरीरावर खोलवर जखमा झाल्या नाहीत.

अस्वलाने हल्ला करताच तानाजी शेळके यांनी आपला बचाव करण्यासाठी ते काजूच्या झाडावर चढले. त्यानंतरही त्यांच्यावर अस्वलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तानाजी शेळके यांच्या धाडसामुळे ते अस्वलाच्या हल्ल्यातून बचावल्याचे सांगण्यात येत आहे. तानाजी शेळके यांच्यावर अस्वलाने यावेळी तीन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्ला झाल्यानंतर तानाजी यांना चंदगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बिबट्या झाला आता अस्वल

चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. कधी हत्तींच्या कळपाकडून शेती पिकाची नासधूस तर कधी गव्यांकडून नुकसान हल्ले होत असतात. आता अस्वलांचे प्रमाण वाढल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगमहट्टी,किटवडे, कलिवडे, पाटणे, जेलगुडे, जांबरे, कोकरे आणि सडेगुडवळे परिसरातही मोठ्या प्रमाणात जंगली जनानवरांकडून शेतीचे नुकसान करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जंगमहट्टीपासून जवळच असलेल्या यशवंतनगर व तुर्केवाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने परिसरात आधीच खळबळ उडाली आहे. आता परत अस्वलाच्या हल्ल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

डोंगराजवळील शेती परिसरात काळजी घ्या

तानाजी शेळके यांच्यावर अस्वलाने हल्ला केला त्यानंतर तात्काळ याबाबतची माहिती सरपंच विष्णू गावडे यांनी पाटणे वनविभागाला दिली. त्यानंतर पाटणे विभागाचे प्रभारी वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनपाल बी. आर. भांडकोळी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी जखमी तानाजीला चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात त्याला उपचारासाठी नेले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. जंगल परिसरात गुरे घेऊन जाताना, शेतात वावरताना स्थानिक लोकांनी सावधानी बाळगावी, असे आवाहन प्रभारी वनक्षेत्रपाल पाटील यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

राजू शेट्टी करणार महावितरणसमोर उपोषण; …आणि या मंत्र्याच्या कार्यालयावरही काढणार मोर्चा

Sanjay Raut: राऊतांच्या घोषणेतले ते ‘साडे तीन नेते’ कळाले का? प्रेस कॉन्फरन्सच्या शेवटी राऊतांनी पुढचं उत्तर दिलं

राऊतांनी भाजपच्या ज्या नेत्याचं नाव घेणे टाळलं, त्याचं नाव दरेकरांनीच उघड केलं, कोण कुणचा गेम करतंय?

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.