AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना अटकेपासून दिलासा, पुणे पोलिसांना न्यायालयाचे आदेश

गेल्या अनेक दिवसांपासून अटकेत असलेले आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर अडचणीत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना पहिल्यांदा काहितरी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना आता अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना अटकेपासून दिलासा, पुणे पोलिसांना न्यायालयाचे आदेश
गुणरत्न सदावर्ते यांना अटकेपासून दिलासाImage Credit source: tv9 marathi
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Apr 26, 2022 | 3:33 PM
Share

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून अटकेत असलेले आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर (St Worker Protest) अडचणीत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना पहिल्यांदा काहितरी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना आता अटकेपासून दिलासा मिळाला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहे. सुरूवातीला मुंबईत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनानंतर गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरू झाली. ती थेट पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, अकोला, सोलापूरपर्यंत जाऊन पोहोचली. गुणरत्न सदावर्ते यांना आता पुणे पोलीस ताब्यात घेणार होते. मात्र न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते या पोलिसांच्या कोठडीतून त्या पोलिसांच्या कोठडीत फिरत आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या अडचणी वाढतच गेल्या, त्यांंना अनेक दिवस कोठडीत काढावे लागले, मात्र आता पुण्यात त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कोठडीत

एसटी कर्मचाऱ्यांची कोर्टात बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्या घराबाहेरील आंदोलन भडकावल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्यांना पहिल्यांदा मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यांनी काही दिवस मुंबईतल्या पोलीस कोठडीत काढले. त्यानंतर कोर्टात झालेल्या युक्तीवादात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अनेक गंभीर आरोपही करण्यात आले. गुणरत्न सादवर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोपही करण्यात आला. त्यातून त्यांनी मालमत्ता खरेदी केल्याचा दावाही करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या पत्नीलाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले. मात्र तोवर गुणरत्न सदावर्ते यांच्यावर साताऱ्यात दुसऱ्या एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता.

अटकेपासून मोठा दिलासा

मराठा आंदोलनावेळी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत मुंबई पोलिसानंतर सातारा पोलिसांनी गुणरत्न सादावर्ते यांचा ताबा घेतला. त्यानंतर साताऱ्यातल्या कोर्टानेही काही दिवस त्यांची कोठडीत रवानगी केली. मात्र तोपर्यंत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. साताऱ्यात थोड्या अडचणी कमी होताच गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. काही दिवस त्यांचा मुक्काम कोठडीत राहिला. आणि कोल्हापुरात थोड्या अडचणी कमी झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा पुणे पोलीस घेणार होते. मात्र त्यांना आता अटकेपासून दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वकील गुणरत्न सदावर्ते हे वादात सापडले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिकेवरून त्यांच्यावर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोपही झाले आहेत.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार