AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिउत्साह भोवला, हरीश्चंद्र गडावर ट्रेकर्स रात्रभर अडकून

चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : हरीश्चंद्र गडावर अडकलेल्या ट्रेकर्सना वाचवण्यात एनडीआरएफ टीम आणि ग्रामस्थांना यश आलंय. तब्ब्ल 20 तास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर सगळे ट्रेकर्स सुखरूप खाली उतरले. मात्र अतिउत्साही ट्रेकर्समुळे संपूर्ण प्रशासन आणि यंत्रणा वेठीस धरली गेली. त्यामुळे ट्रेकर्सच्या नियमांबाबत कठोर पावलं उचलण्याची मागणी करण्यात येत आहे. हरीश्चंद्र गड हा अहमदनगर, पुणे […]

अतिउत्साह भोवला, हरीश्चंद्र गडावर ट्रेकर्स रात्रभर अडकून
| Edited By: | Updated on: Feb 15, 2020 | 6:05 PM
Share

चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : हरीश्चंद्र गडावर अडकलेल्या ट्रेकर्सना वाचवण्यात एनडीआरएफ टीम आणि ग्रामस्थांना यश आलंय. तब्ब्ल 20 तास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर सगळे ट्रेकर्स सुखरूप खाली उतरले. मात्र अतिउत्साही ट्रेकर्समुळे संपूर्ण प्रशासन आणि यंत्रणा वेठीस धरली गेली. त्यामुळे ट्रेकर्सच्या नियमांबाबत कठोर पावलं उचलण्याची मागणी करण्यात येत आहे.

हरीश्चंद्र गड हा अहमदनगर, पुणे आणि ठाणे या तिनही जिल्ह्यांच्या सरहदद्दीवर आहे. ट्रेकर्स या किल्ल्यावर कायमच येत असतात. अनेक ट्रेकर्स इथे रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग आणि ट्रेकिंगसाठी येतात. मात्र रविवारी मुंबई आणि औरंगाबादवरून आलेल्या ट्रेकर्सला त्यांच्याच निष्काळजीपणामुळे मृत्यू अगदी जवळून अनुभवावा लागला.

सोबत नेलेले ट्रेकिंगचे साहित्य तपासून आणि अभ्यासून नेलं नाही तर काय होऊ शकतं याचा अनुभव या ट्रेकर्सना आला. कोकणकडा या भागातून दोरखंड खाली सोडून रॅपलिंगचा या ट्रेकर्सचा प्लॅन होता. मात्र खाली उतरत असताना त्यांच्या सोबत आणलेला रोप अपूर्ण पडला आणि रात्रभर त्यांना अक्षरशः काळोख्या अंधारात मदतीची वाट बघावी लागली.

यापैकीच एका ट्रेकरने मग एनडीआरएफ आणि पोलिसांना आपण कोकणकडावर अडकल्याची माहिती दिली आणि प्रशासन अक्षरशः खडबडून जागं झालं. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू ऑपेरेशन सुरु करण्यात आलं. राज्यातला सर्वाधिक दोन नंबर उंच असलेला हरिश्चंद्र गड प्रचंड अजस्त्र तर आहेच, मात्र नवख्या ट्रेकर्सने इथे अति उत्साह दाखवू नये असा सल्ला रहिवासी देतात.

सुमारे 1850 फूट उंच असलेल्या गडावर ग्रामस्थ,  वन विभाग आणि प्रशासनाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं. घनदाट जंगल,  मोठे दगड, किर्रर्र अंधारी झाडी यातून मार्ग काढत अधिकारी या ट्रेकर्सच्या मदतीसाठी धावले. टीव्ही 9 ची टीमही या यंत्रणेसोबत होती.

तब्ब्ल 20 तास कोकणकड्याच्या एका टप्प्यावरून खालच्या टप्प्यावर या ट्रेकर्सला आणण्यात आलं. रोपच्या सहाय्याने त्यांना खाली उतरून बेस कॅम्पवर नेण्यात आलं. तब्ब्ल 20-22 तासांनी सगळ्या ट्रेकर्सला सुखरूप खाली आणण्यात आलं.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.