Maratha Reservation Live | आतापर्यंत 10 मराठा मुख्यमंत्री, अनेकांचे साखर कारखाने, आरक्षण चुकीचं : गुणरत्न सदावर्ते

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज (28 ऑगस्ट) सुनावणी झाली (Hearing on Maratha Reservation). या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने आज विरोधकांची बाजू ऐकून घेतली.

Maratha Reservation Live | आतापर्यंत 10 मराठा मुख्यमंत्री, अनेकांचे साखर कारखाने, आरक्षण चुकीचं : गुणरत्न सदावर्ते
Follow us
| Updated on: Aug 28, 2020 | 4:14 PM

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज (28 ऑगस्ट) सुनावणी झाली (Hearing on Maratha Reservation). राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात पी. एस पटवालिया, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. याआधी बुधवारी (26 ऑगस्ट) झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची बाजू ऐकून घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आज विरोधकांची बाजू ऐकून घेतली. यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टात आपली भूमिका मांडली.

“एसटीला (अनुसूचित जाती) आरक्षण मिळालं त्यावेळी आरक्षणाचा 50 टक्क्यांचा टप्पा ओलांडला नव्हता. एसटी समाज सर्वात जास्त मागासवर्ग आहे, असा अहवाल सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून मागासवर्ग आधारावर मराठा समाजाला आरक्षण कसं देण्यात आलं? राज्यात मराठा समाजाचे 10 पेक्षा जास्त मुख्यमंत्री झाले. अनेक मराठा समाजाच्या नेत्यांचा आणि लोकांचे साखर कारखाने आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणं चुकीचे आहे”, अशी भूमिका सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टात मांडली.

“मराठा समाजाच्या मतांचा फायदा बड्या राजकीय नेत्यांना झाला पाहिजे, यासाठी मराठा समाजाच्या नेत्यांची मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी चढाओढ सुरु आहे”, असंदेखील गुणरत्न सदावर्ते सुप्रीम कोर्टात म्हणाले.

महाराष्ट्र सरकारसह अनेक याचिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाची सुनावणी ईडब्ल्यूएसच्या सुनावणीसोबत पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करावी, अशी विनंती केली आहे (Hearing on Maratha Reservation).

दरम्यान, सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने याबाबतची पुढील सुनावणी येत्या मंगळवारी 1 सप्टेंबर रोजी होईल, असे जाहीर केले.

अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

सुप्रीम कोर्टाने अजून निष्कर्ष काढला नाही. राज्य सरकारमे 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून आरक्षण दिले आहे. त्याला कायदेशीर आधार आहे. हा विषय संवैधानिक बेंचपुढे जावं ही राज्य सरकारची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

                                                         Live Update :

  • अधिवक्ते गुणरत्न सदावर्ते – एसटीला आरक्षण मिळालं त्यावेळी आरक्षणाचा 50 टक्क्यांचा टप्पा ओलांडला नव्हता. एसटी समाज सर्वात जास्त मागासवर्ग आहे, असा अहवाल सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून मागासवर्ग आधारावर मराठा समाजाला आरक्षण कसं देण्यात आलं? राज्यात मराठा समाजाचे 10 पेक्षा जास्त मुख्यमंत्री झाले. अनेक मराठा समाजाच्या नेत्यांचा आणि लोकांचे साखर कारखाने आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणं चुकीचे आहे.
  • अधिवक्ते गुणरत्न सदावर्ते – मराठा समाजाच्या मतांचा फायदा बड्या राजकीय नेत्यांना झाला पाहिजे, यासाठी मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी चढाओढ सुरु आहे.
  • अधिवक्ते भटनागर – गायकवाड कमीशनने मराठा आरक्षणअंतर्गत मराठा समाजाची बाजू मांडली होती. मराठा आरक्षण देण्यावर सूचना केल्या नाहीत, असा दावा केला आहे.
  • अधिवक्ते शंकर नारायण – एसीबीसी आरक्षण अंतर्गत मराठांना आरक्षण मिळाला आहे. मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी घटनापीठाकडे वर्ग करण्याची गरज नाही
  •   सुप्रीम कोर्ट – बार असोसिएशन प्रत्यक्ष सुनावणी मागणी करत आहे. मात्र, प्रत्यक्ष सुनावणी पुढच्या आठवड्यापासून शक्य नाही.
  • अधिवक्ते श्याम दिवान – सप्टेबरपासून प्रत्यक्ष सुनावणी सुरु करावी. मराठा आरक्षणमध्ये व्यवस्थीत युक्तीवाद करता येईल.
  • अधिवक्ते रफिक दादा यांनी मराठा आरक्षणाची सुनावणीसाठी ईडब्लूएसप्रमाणे संवैधानिक खंडपीठाकडे वर्ग करावा असा युक्तीवाद केला.

[svt-event title=”सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरु” date=”28/08/2020,2:57PM” class=”svt-cd-green” ] सरकारकडून अधिवक्ते पीएस पटवालिया यांनी बाजू मांडली. “मराठा आरक्षण राज्य सरकारने विधीमंडळमध्ये एकामताने मंजूर केलं आहे. संसदमध्ये आरक्षण दिले जातं, तसंच आरक्षण राज्य सरकारने दिलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पाच न्यायधीशच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी वर्ग करावा, अशी बाजू पीएस पटवालिया यांनी मांडली. [/svt-event]

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.