Hingoli | शिवसेनेने सगळे मुद्दे सोडले, म्हणून मी शिवसेना सोडतोय… हिंगोलीचे माजी शिवसेना खासदार अ‍ॅड शिवाजी माने आता भाजपात

शिवसेनेवर आरोप करताना अॅड. शिवाजी माने म्हणाले, ' हिंदुत्वासाठी लढणारे आम्ही . त्यावेळेस होतो आमच्या रक्ताने -कष्टाने शिवसेना उभी राहिलेली आहे. मी तर सुरुवात आहे येणाऱ्या काळात अजून कित्येक जण शिवसेना सोडतील.

Hingoli | शिवसेनेने सगळे मुद्दे सोडले, म्हणून मी शिवसेना सोडतोय... हिंगोलीचे माजी शिवसेना खासदार अ‍ॅड शिवाजी माने आता भाजपात
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 2:37 PM

हिंगोली : शिवसेनेचे माजी खासदार अ‍ॅड शिवाजी माने (Shivaji Mane) यांनी शिवसेनेला दुसऱ्यादा जय महाराष्ट्र ठोकत नुकताच भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला . माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis),केंद्रीय मंत्री नारायण राणे , चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह भाजपच्या बंड्या नेत्यांच्या हस्ते त्यांनी कमळ हाती घेतलं. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, महाराष्ट्रातल्या जनतेला त्रास द्यायला सुरवात केली, मुळात आता सगळेच मुद्दे सोडलेले आहेत. म्हणून मी शिवसेना सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 च्या सभेमध्ये मला उद्धव ठाकरे यांनी जुलमाचं शिव बंधन बांधलं. मी त्यांना शिव बंधन बांधा म्हणलो नव्हतो…असंही अ‍ॅड. शिवाजी माने म्हणाले.

‘येत्या काळात अनेकजण शिवसेना सोडतील’

शिवसेनेवर आरोप करताना अ‍ॅड. शिवाजी माने म्हणाले, ‘ हिंदुत्वासाठी लढणारे आम्ही . त्यावेळेस होतो आमच्या रक्ताने -कष्टाने शिवसेना उभी राहिलेली आहे. मी तर सुरुवात आहे येणाऱ्या काळात अजून कित्येक जण शिवसेना सोडतील. माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने मी शिवसेना सोडली आहे’.

 कोण आहेत अ‍ॅड. माजी खासदार शिवाजी माने?

शिवाजी माने हे 1996 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले. 12 व्या आणि 14 व्या लोकसभेत ते खासदार म्हणून निवडून आले. 2006 च्या दरम्यान त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर 2004 च्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभवाचं खापर फोडत शिवसेना सोडली. 2008 ला ते काँग्रेसमध्ये गेले. कॉग्रेसने त्यांना जिल्हा अध्यक्ष पदाची जाबाबदारी दिली होती. त्या वेळी त्यांनी काँग्रेसचे बहुसंख्य जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले होते. नंतर कॉग्रेस मध्ये राजीव सातव अ‍ॅक्टिव्ह झाले. त्यामुळे पक्षात माने आणि सातव यांचे जमत नसल्याने माने यांनी 2014 साली कॉग्रेसला राम राम ठोकला व राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. 2015 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने माने यांना एकही तिकीट दिलं नसल्याने माने पुन्हा नाराज झाले. त्यांनी 15 ते 2019 पर्यंत त्यांनी राष्ट्रवादीत दिवस काढले. पुन्हा 2019 च्या निवडणुकीत घर वापसी केली. आमदार संतोष बांगर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आखाडा बाळापूर येथे सभेसाठी आले असता त्यांनी भर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला होता. पुन्हा आता त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.