AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंगोलीत दोन्ही नगर पंचायतींवर शिवसेनेचे अध्यक्ष, वाचा औंढा नागनाथ आणि सेनगाव नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी?

सेनगाव येथे शिवसेनेच्या ज्योती देशमुख यांची बहुमताने निवड झाली. या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आली होती. तर औंढा नागनाथ नगर पंचायतीत शिवसेनेची एक हाती सत्ता आल्याने येथेही शिवसेनेच्या राजू उर्फ कपिल खंदारे यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

हिंगोलीत दोन्ही नगर पंचायतींवर शिवसेनेचे अध्यक्ष, वाचा औंढा नागनाथ आणि सेनगाव नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी?
औंढा नागनाथ नगरपंचायतीचे अध्यक्षपदी निवड झालेले कपिल खंदारे
| Edited By: | Updated on: Feb 17, 2022 | 2:40 PM
Share

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औंढा नागनाथ (Aundha Nagnath) या दोन नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक आज मोठ्या गाजावाजात पार पडली. सेनगाव येथे शिवसेनेच्या ज्योती देशमुख (Jyoti Deshmukh) यांची बहुमताने निवड झाली. या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आली होती. तर औंढा नागनाथ नगर पंचायतीत शिवसेनेची एक हाती सत्ता आल्याने येथेही शिवसेनेच्या राजू उर्फ कपिल खंदारे (Kapil Khandare) यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. दोन्ही नगराध्यक्षपदांची निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने विजयी मिरवणूक काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी करत हा विजय साजरा केला.

सेनगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा अध्यक्ष

Jyoti Deshmukh

सेनगाव नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ज्योती देशमुख

सेनगाव नगराअध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. येथे आज नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या वतीने एक तर भाजपाच्या वतीने एक नाम निर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. नगरपंचायतच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर नगराध्यक्ष पद कुणाकडे जाते याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. या निवडणुकीत सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले असले तरी सध्या सेनगाव नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आली. या निवडणुकीत काही धक्कादायक निकालही लागले होते त्यात शिवसेनेचे 05, राष्ट्रवादी 05,भाजप 05,कॉग्रेस 02 असा त्रिशंकू निकाल मतदारांनी दिला होता. मात्र भाजपा चमत्कार करील अस बोलले जात होते. मात्र चमत्कार होईल हा भाजपचा दावा फोल ठरवत सेनगाव मध्ये महाविकास आघाडीने झेंडा रोवला आहे…सेनगाव येथे शिवसेनेच्या ज्योती देशमुख यांची बहुमताने अध्यक्षपदासाठी निवड झाली.

औंढा नागनाथमध्येही शिवसेनेचे अध्यक्ष

इकडे औंढा नागनाथ नगराअध्यक्ष पद अनुसूचित सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहे. या ठिकाणी शिवसेनेतर्फे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. औंढा नागनाथ नगरपंचायतीत शिवसेनेची एक हाती सत्ता आली आहे. येथे राजू उर्फ कपिल खंदारे यांची नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली. औंढा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडून आल्याने शिवसेनेची एक हाती सत्ता आली. तर काँग्रेसचे 04 भाजपाचे 02 वंचित आघाडीचे 02 असे पक्षीय बलाबल इथे दिसून आले.

इतर बातम्या-

दगडफेकप्रकरणी तिघा आदिवासींना अटक, आम्हालाही अटक करा म्हणत आदिवासींनी पोलीस स्टेशनबाहेरच धरला ठेका

2 दिवसानंतर फरहान शिबानीचं लग्न, खंडाळ्यातलं फार्म हाऊस सजवलं; मोजक्या लोकांना आमंत्रण

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.