Ajit Pawar : महामहिम राज्यपालांनी वाद निर्माण करू नयेत, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांची नाराजी; म्हणाले…

महाराष्ट्र एकसंघ राहावा, ही सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे राज्यपालांनी अशी वक्तव्य करू नये, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपले स्टेटमेंट (Statement) देऊन विषय संपवावा, असेही पवार म्हणाले.

Ajit Pawar : महामहिम राज्यपालांनी वाद निर्माण करू नयेत, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांची नाराजी; म्हणाले...
अजित पवार/भगत सिंग कोश्यारीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 8:31 PM

हिंगोली : महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा चालत नाही. त्यामुळे महामहिम राज्यपालांनी वाद निर्माण करू नयेत, असे मत विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. राज्यपाल्यांनी केलेल्या वक्तव्यावर अखेर अजित पवारांनी मौन सोडले. ते हिंगोलीत बोलत होते. पूरपरिस्थिती आणि त्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा, पाहणी ते करत आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat singh Koshyari), त्यांचे वक्तव्य याविषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, की संविधानिक मनाचा पद आहे. पण अशी काही त्यांच्याकडून स्टेटमेंट होत आहेत. मराठी माणसांनी महाराष्ट्र घडविला आहे. अनेक मोठी माणसे होऊन गेली. अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला. अनेक हुताम्यांनी रक्त सांडले. त्यामुळे महाराष्ट्र एकसंघ राहावा, ही सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे राज्यपालांनी अशी वक्तव्य करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपले स्टेटमेंट (Statement) देऊन विषय संपवावा, असेही पवार म्हणाले.

‘तातडीने मदत झाली पाहिजे’

मंत्रिमंडळासाठी मुख्यमंत्र्यांना दिल्ली दौरा करावा लागतो यावर विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार म्हणतात, की मला या बद्दल बोलायचे नाही. पण महिना उलटून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. याबद्दल मला नागरिक, शेतकरी म्हणून असे वाटत, की नैसर्गिक संकटावेळी तातडीने मदत झाली पाहिजे. एक एक महिना सर्व खाती फक्त मुख्यमंत्र्यांकडे आहेत. उपमुख्यमंत्री यांच्याकडे एकही खाते नाही. सगळ्या फाइल्स मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत. मागच्या वेळी 7 मंत्र्यांचे काही महिने सरकार होते. पण खाती विभागलेली होती. त्यांनी कितीदा कुठे जावे याबद्दल मला बोलायचे नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत त्यांच्या दारापर्यंत कशी पोहोचेल याचा विचार झाला पाहिजेत, असे ते म्हणाले.

‘हेच आमचे खरे दुखणे’

मंत्रिमंडळाचा विस्तारही होत नाही आणि हे पावसाळी अधिवेशन ही घेत नाहीत. आमची मागणी आहे ताबडतोब पावसाळी अधिवेशन बोलवा, म्हणजे ज्यांनी दौरे केले ते लोक आपले प्रश्न अधिवेशनात मांडू शकतील. गरज पडली तर कायदे करू शकतील, आता आम्ही जे काही यांना सांगणार आहोत, त्यावर काही होते की नाही हे ही आम्हाला कळायला मार्ग नाही. हेच खरे आमचे दुखणे आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

अजित पवारांची पत्रकार परिषद

‘…मग त्यावेळी शिंदेंनी का नाही विरोध केला?’

हिंगोली वसमत येथे 100 कोटी रुपयांचे मॉर्डन मार्केटला मागील सरकारने मंजुरी दिली होती. यावर अजित पवार यांना विचारले असता, हे सरकार सर्व निर्णयांना स्थगिती देत आहे. निर्णय जर चुकीचे होते तर त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी का विरोध केला नाही? त्यावेळीच्या निर्णयांना समर्थन द्यायचे आणि आता मुख्यमंत्री झाल्यावर स्थगिती द्यायची, हे काही बरोबर नाही. आम्ही याबद्दल पावसाळी अधिवेशनात बोलणार आहोत, असे अजित पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.