हिंगोलीत वेदनादायक घटना: पाच हजारांहून अधिक महिलांची यशस्वी प्रसूती करणाऱ्या परिचारिकेचा मृत्यू

ज्योती गवळी या हिंगोली जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात कार्यरत होत्या. ज्योती गवळी या अत्यंत कष्टाळू आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. आतापर्यंत 5 हजारांहून अधिक महिलांची त्यांनी प्रसूती केल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

हिंगोलीत वेदनादायक घटना: पाच हजारांहून अधिक महिलांची यशस्वी प्रसूती करणाऱ्या परिचारिकेचा मृत्यू
पाच हजारांहून अधिक महिलांची यशस्वी प्रसूती करणाऱ्या परिचारिकेचा मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 11:24 PM

हिंगोली : हिंगोलीत एक वेदनादायक घटना घडली आहे. पाच हजारांहून अधिक महिलांची यशस्वी प्रसूती करणाऱ्या परिचारिकेचा स्वतःच्या प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याची घटना हिंगोलीत घडली आहे. प्रसुतीनंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंतीमुळे या परिचारिकेला आपला जीव गमवावा लागला आहे. ज्योती गवळी असे या दुर्दैवी परिचारिकेचे नाव आहे.

प्रसुतीनंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रकृती खालावली

हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ज्योती गवळी यांनी 2 नोव्हेंबर रोजी हिंगोली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला. प्रसुतीनंतर त्यांना रक्तस्त्राव होत असल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना हिंगोली येथील सिव्हिल हॉस्पिटलमधून नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे आल्यानंतरही त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले. मात्र, तेथेही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर रविवारी प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले.

अतिशय मनमिळाऊ व्यक्तिमत्व होते

ज्योती गवळी या हिंगोली जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात कार्यरत होत्या. ज्योती गवळी या अत्यंत कष्टाळू आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. आतापर्यंत 5 हजारांहून अधिक महिलांची त्यांनी प्रसूती केल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यांच्या मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वामुळे त्या सर्वांच्या आवडत्या परिचारिका होत्या. त्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्याने रुग्णांसह हिंगोली जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मुलाच्या जन्मानंतर प्रसूती रजेवर जाणार होती

रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, ज्योती गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांमध्येही काम करत होती. मुलाच्या जन्मानंतर ती प्रसुती रजेवर जाणार होती. गेल्या दोन वर्षांपासून ती हिंगोली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत होती. याआधी तिने इतर आरोग्य केंद्रात तीन वर्षे काम केले होते. (Death of a nurse in hingoli who successfully delivered more than 5,000 women)

इतर बातम्या

पंढरीच्या वारीत चोरांची टोळी, 7 महिलांसह 21 भामटे जेरबंद, पंढरपूर पोलिसांची मोठी कारवाई!

पुणेकरांसाठी खुशखबर ! म्हाडाच्या 2 हजार 823 सदनिकांच्या नोंदणीस आजपासून सुरुवात

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.