उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी कार्यकर्त्यांची स्पर्धा; कोणत्या जिल्ह्यातून किती कार्यकर्ते येणार त्याचा आकडाच सांगितला…

महाविकास आघाडीची ही पहिलीच सभा होणार असल्याने कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीत ही सभा होणार असल्याचा विश्वास नेत्यांनी बोलून दाखवला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी कार्यकर्त्यांची स्पर्धा; कोणत्या जिल्ह्यातून किती कार्यकर्ते येणार त्याचा आकडाच सांगितला...
| Edited By: | Updated on: Mar 29, 2023 | 9:44 PM

हिंगोली : राज्यातील राजकारण प्रचंड तापलेले असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभांचा धडाका लावला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठी ऊर्जा निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील सभा, त्यानंतर मालेगावमधील सभा आणि आता औरंगाबादमधील सभेमुळ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. या सभेविषयी ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांची ही सभा अलोट गर्दीत तर होणार आहेच मात्र या सभेवेळी मैदान अपुरं ठरतं की काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांची ही सभा अलोट गर्दीत होणार असल्याचा विश्वास बोलून दाखवताना त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साहही यावेळी सांगितला. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळेच ही सभा अलोट गर्दात होणार असल्याचा विश्वास त्यांना आहे.

संभाजीनगरमध्ये होणाऱ्या सभेत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मिळून कार्यकर्ते येणार आहेत. महाविकास आघाडीची संभाजीनगरमधील ही पहिलीच सभा असल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही या सभेची उत्सुकता लागून राहिल्याचे त्यांनी सांगितले.

ही सभा कधी होणार असा सवाल ही सभा ठरल्यापासून कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. याबाबत झालेल्या नांदेडमधील बैठकीतही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली असंही त्यांनी यावेळी सांगितले.

ही सभा होण्याआधीच कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा सुरु असल्याचेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. कारण नांदेड, परभणी आणि मराठवाड्यातील अनेक गावांमधून या सभेसाठी कार्यकर्ते येणार आहेत.नांदेडमधूल 25 हजार कार्यकर्त्यांनी येणार असल्याचा विश्वासही दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीची ही पहिलीच सभा होणार असल्याने कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीत ही सभा होणार असल्याचा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी बोलून दाखवला आहे.