जेव्हा राज्याचे गृहमंत्री कन्यादान करणार!

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकारातून रक्ताचं नातं नसलेल्या गतिमंद आणि मूकबधिर मानसकन्येच्या आयुष्याचा शुभारंग आज नागपुरात होणार आहे.

जेव्हा राज्याचे गृहमंत्री कन्यादान करणार!
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 7:47 AM

नागपूर: लग्न म्हणजे दोन जिवांसह दोन कुटुंबाचं मिलन. लग्न सोहळ्यात वधू-वरासह सर्वांचं लक्ष असतं ते नवरी मुलगी आणि नवऱ्या मुलाच्या आईवडिलांकडे. पण ज्यांचे रक्ताचे नातेवाईकच नाहीत आणि ज्यांना सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगणं खूप कठीण जातं त्यांचं काय? तर त्यांचे पालकत्व स्वीकारतात खुद्द राज्याचे गृहमंत्री आणि जिल्हाधिकारी महोदय. नागपुरात असाच एक अनोखा लग्न सोहळा आज पार पडणार आहे. या लग्नात कन्यादान करणार आहेत गृहमंत्री अनिल देशमुख, तर मुलाच्या वडिलांच्या जागी नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे असणार आहेत. (special marriage ceremony will be held in Nagpur)

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकारातून रक्ताचं नातं नसलेल्या गतिमंद आणि मूकबधिर मानसकन्येच्या आयुष्याचा शुभारंग आज नागपुरात होणार आहे. गतिमंद आणि मूकबधिर अनाथ मुलांचं संगोपन आणि पुनर्वसनासाठी काम करणारे सामाजिक कार्यक्रर्ते शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या वर्षा आणि अनाथालय बालगृहातील समीर यांचा विवाह सोहळा आज संपन्न होणार आहे. यावेळी वर्षाचे कन्यादान खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या पत्नी आरती देशमुख हे करणार आहेत.

बेवारस अवस्थेत सापडले मुलगा आणि मुलगी!

23 वर्षांपूर्वी वर्षा पोलिसांना रेल्वे स्थानकावर बेवारस अवस्थेत सापडली होती. शंकरबाबा यांनी तिचा आई-वडिलांप्रमाणे सांभाळ केला. दुसरीकडे डोंबिवलीत बेवारस अवस्थेत सापडलेल्या समीरचाही शंकरबाबांनी वझ्झरच्या अनाथालयात सांभाळ केला. वर्षाचं कन्यादान गृहमंत्री करणार आहेत. तर समिरचे वडील म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे उभे राहणार आहेत.

संसारोपयोगी साहित्य द्या- देशमुख

हा विवाह सोहळा रविवारी (20 डिसेंबर) रोजी संध्याकाळी 5 वाजता संपन्न होईल. पोलीस लाईन टाकळीमधील सद्भावना लॉन्समध्ये हा विवाह सोहळा पार पडेल. यावेळी कोरोनाचे नियम पाळून वधू-वरांना शुभार्शीवाद देण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावं. नागरिकांनी या दाम्पत्याला संसारोपयोगी साहित्य दिलं तर अधिक आनंद होईल, असं मत गृहमंत्री देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.

संबंधित बातम्या:

ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य कालवश, भाजप नेत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार होणार

सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा, 24 लाख रुपयांनी भरलेली बॅग पोलिसांच्या स्वाधीन, पोलिसांकडून सत्कार

special marriage ceremony will be held in Nagpur

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.