AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावमध्ये कारचा भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. जळगाव परिसरातील गाडेगाव येथील घाटात चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

जळगावमध्ये कारचा भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी
जळगावमध्ये भीषण अपघात Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 16, 2026 | 9:57 PM
Share

जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. जळगाव परिसरातील गाडेगाव येथील घाटात चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त वाहनातून सहा जण प्रवास करत होते, याच दरम्यान जळगाव परिसरातील गाडेगाव येथील घाटात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जवळील गाडेगाव येथील घाटात हा अपघात घडला आहे. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानंतर वाहनाने सहा पलट्या मारल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या कारचा जेव्हा अपघात झाला तेव्हा सहा जण प्रवास करत होते. यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान या अपघातामधील मृत आणि जखमींची नाव अद्याप समोर आलेली नाहीयेत, मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये कारचा देखील चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात झाला तेव्हा कारने तब्बल सहा पलट्या मारल्याचं येथील स्थानिकांनी सांगितलं. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा देखील चुराडा झाला आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान