AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sarangkheda| आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत, हिरव्या रानी…मधुलिका कुलीन रुबीची उंची 63 इंच, किंमत 33 लाख…!

सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये दत्त जयंतीपासून अधिक रंगत आली आहे. 22 तारखेपर्यंत असे किमती घोडे दाखल होतील. त्यांच्या किमती दोन कोटींपर्यत असतील असे अश्व जाणकार सांगतात.

Sarangkheda| आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत, हिरव्या रानी...मधुलिका कुलीन रुबीची उंची 63 इंच, किंमत 33 लाख...!
सारंगखेडा येथील बाजारात अतिशय उमद्या जातीचे अश्व आले आहेत.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Dec 19, 2021 | 1:12 PM
Share

नंदुरबारः देशभरात प्रसिद्ध असलेल्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारात 2 हजार घोडे दाखल झाले आहेत. मात्र, सध्या बाजारात चर्चा आहे ती युवराज, सुलतान, रुबी आणि मानसी यांच्या ऐटदार रुबाबाची. त्यांची चाल पाहण्यासाठी अनेक रसिक जीव कुरवंडी करून टाकतायत. त्यांची किंमत ऐकूण तर कोणालाही धक्काच बसेल. जाणून घेऊयात या आगळ्यावेगळ्या घोडेबाजाराची आगळीवेगळी माहिती…

5 लिटर दूध, 1 किलो तूप…

घोड्याची किंमत ही त्याची उंची, रंग आणि चाल याच्यावर ठरत असते. घोडा जितका रुबाबदार तितकी त्याची किंमत जास्त. सारंगखेड्याचा घोडे बाजारात दाखल झालेल्या रुबीची किमत एक लाख नाही दोन लाख नाही, तर तब्बल 33 लाख आहे. आपल्याला प्रश्न पडला असेल याची किमत इतकी का…? सारंगखेड्याच्या घोडा बाजरात दाखल झालेल्या दोन हजार घोड्यामध्ये रुबी महाराणीप्रमाणे रुबाबदार आहे. तिची उंची 63 इंच आहे. चाल रुबाबदार आहे. ती मधुलिका परिवारातील आहे. तीची सेवा करण्यासाठी 24 तास 4 मजूर असतात. तिच्या खानपानाची विशेष काळजी घेतली जाते. तिला दररोज 5 लिटर दूध, एक किलो गावराण तूप, चणाडाळ, गहू, बाजरीसोबत कोरडा आणि सुका चारा दिला जातो.

अभिनेत्रीला लाजवेल अशी अदा…

सारंगखेडा येथील घोडे बाजरात रुबीनंतर बोलबाला आहे तो अप्सरा या सिंदी जातीच्या घोडीचा. तिची चाल आणि अदा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आश्र्वप्रेमी तिची रॅम्पवर वाट पाहत बसतात. डौलदार चाल, एखाद्या देखण्या अभिनेत्रीला लाजवेल अशी अदा. तिची उंची 64 इंच आहे. एखद्या सौंदर्यवतीप्रमाणे तिच्या खुराकाची काळजी घेतली जाते. तिच्या आहारात दररोज 5 लिटर दूध, 1 किलो तूप, अंडी, गहू, चणा, आदी खाद्याचा समावेश आहे. चेतकची रुबाबदार चाल अनेकांना भुरळ घालत असते.

21 लाखांचा युवराज…

सारंगखेड्याच्या घोडे बाजारात चर्चा आहे, तो उज्जैनहून दाखल झालेला अवघ्या 32 महिन्यांच्या युवराजची. त्याची डौलदार चाल, उंची त्यातील शुभ लक्षणे आणि त्याचसोबत त्याचा किमतीमुळे. पांढराशुभ्र युवराज नुकरा जातीचा अश्व आहे. त्याचे कान मारवाड आहेत. त्यात त्याची उंची 65 इंच इतकी आहे. ती अजून वाढेल. त्यामुळे तो बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेतो. त्याची किंमत आहे 21 लाख इतकी आहे. त्याचा खुराकही तितकाच दमदार आहे. त्याच्या खाणपानावर विशेष लक्ष ठेवले जाते.

2 कोटींपर्यंत किंमत

इतके महागडे घोडे विकत घेणे अनेक अश्व शौकीनांना शक्य नसते. त्यामुळे देशभरातील अश्वप्रेमी कुलीन घोड्यांना पाहण्यासाठी सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलला हजेरी लावत असतात. असे रुबाबदार घोडे आजपर्यत आम्ही कुठेही पहिले नसल्याचे या वेळी अश्वशौकीनांनी सांगितले. सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये दत्त जयंतीपासून अधिक रंगत आली आहे. 22 तारखेपर्यंत असे किमती घोडे दाखल होतील. त्यांच्या किमती दोन कोटींपर्यत असतील असे अश्व जाणकार सांगतात. जर तुम्हालाही असे रुबाबदार, देखणे घोडे पाहायचे असतील, तर आपल्या या घोडेबाजाराला जरूर भेट द्या.

इतर बातम्याः

Nashik| खाणीत बुडून 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; आपली मुले खेळायला कुठे जातायत यावर लक्ष ठेवा…!

नाशिक महापालिकेची प्रभागरचना फुटल्याचा आरोप; नगरसेवकाच्या घरात बसून स्वकियांचाही करेक्ट कार्यक्रम

Nashik | अंधेर नगरी चौपट राजा…गैरकारभाराचे बिंग फोडले म्हणून नाशिकमध्ये महिला वकिलावर भरदिवसा पेट्रोलहल्ला

Follow Us
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम...
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम सरोदंचं मोठं विधान, काय म्हणाले?
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपीला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंच्या FDA ला मोठा दणका, तब्बल 5 लाखांचं...
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंच्या FDA ला मोठा दणका, तब्बल 5 लाखांचं... कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने मोठी खळबळ
तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया,
तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार,
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार, चक्क... धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी..
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी; थेट...
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... बड्या नेत्याचं विधान
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... पुन्हा बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री?
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीत...
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना सूचना
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना महत्त्वाच्या सूचना... मोठी अपडेट समोर
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य