दीराकडून वारंवार प्रेमाची मागणी, नाशिकमध्ये विवाहितेची आत्महत्या

  • Updated On - 4:55 pm, Fri, 5 July 19 Edited By:
दीराकडून वारंवार प्रेमाची मागणी, नाशिकमध्ये विवाहितेची आत्महत्या

नाशिक : दीराकडून वारंवार होणाऱ्या प्रेमाच्या मागणीमुळे आणि सासरच्या जाचाला कंटाळत एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या नवऱ्यासह दोन दीरांना बेड्या ठोकल्या आहेत.

नाशिकमधील या विवाहितेने दोन दिवसांपूर्वी राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. मात्र तिने आत्महत्या करताच पोलिसांकडे तक्रार दिली. बहिणीच्या सासरच्यांकडून पैशांची मागणी होत होती आणि मानसिक छळ केला जात होता, असं पीडितेच्या भावाने सांगितलं.

बहिणीचा नवरा किरण हा सतत मारहाणही करत होता. विशेष म्हणजे तिचा दीर विकी तिच्याकडे वारंवार प्रेमाची मागणी करत होता. या सर्व त्रासाला कंटाळून आपल्या बहिणीने आत्महत्या केली, अशी तक्रार पीडितेच्या भावाने केली आहे.

याविषयी पोलिसांकडे तक्रार प्राप्त होताच नवरा किरण सैंदाणे आणि दीर विकी सैंदाणेसह सासू-सासरे आणि अजून एका दीरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवऱ्यासह दीरांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांना फाशीचीच शिक्षा, द्यावी अशी संतप्त मागणी तक्रारदार भावाने केली.