मुल होण्यासाठी ती बाबांकडे गेली, पण ढोंगी बाबाने जे केले त्यामुळे…

मुल होण्यासाठी अनेक वैद्यकीय उपचार उपलब्ध झाले आहेत. परंतु काही जण अजूनही अंधश्रद्धेमुळे ढोंगी बाबांच्या दरबारात जातात. अमरावती जिल्ह्यात मूल होण्यासाठी ढोंगी बाबाकडे गेलेल्या महिलेवर त्याने अत्याचार केला आहे.

मुल होण्यासाठी ती बाबांकडे गेली, पण ढोंगी बाबाने जे केले त्यामुळे...
ढोंगी बाबा संतोष बावणे
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 2:46 PM

स्वप्नील उमप, अमरावती : भाविकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन ढोंगी बाबा अनेकांची फसवणूक करत असतात. अमरावती जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. मूल होण्यासाठी एक महिला ढोंगी बाबा संतोष बावणे याच्याकडे गेली. या बाबाने महिलेच्या श्रद्धेचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी त्या ढोंगी बाबाला २४ तासांत अटक केली. त्याच्यावर बलात्कार, जादूटोणासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबाकडे दर पोर्णिमेला भाविकांची मोठी गर्दी असते.

कुठे घडली घटना

अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील कूकसा येथे एका ढोंगी बाबाने आपले बस्तान बसवले आहे. मूलबाळ करून देत असल्याचे सांगत ढोंगी बाबा संतोष बावणे दरबार भरवत असतो. दर पौर्णिमेला बाबाच्या दरबारात मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यात मूल बाळ व्हावे यासाठी भक्तांची गर्दी जास्त असते. भाविकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन हा बाबा त्यांची फसवणूक करत असतो.

हे सुद्धा वाचा

विवाहितेवर केला बलात्कार

मूलबाळ करून देत असल्याचे सांगत ढोंगी बाबा संतोष बावणे याने एका विवाहित बलात्कार केला. महिलेवर नदीकाठी घेऊन जाऊन त्या ठिकाणी बलात्कार केला. फरार ढोंगी बाबाला 24 तासांत पोलिसांनी अटक केली. त्याला कोकर्डा येथून अटक केली आहे. दर्यापूर तालुक्यातील कुकसा येथे ही घटना घडली आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी अन् पोलीस प्रशासन दाखल झाले आहे. आरोपीवर बलात्कार, जादूटोणासह विविध कलमानुसार बाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे अंधश्रद्धेचा कायदा

अंधश्रद्धेतून कुणाचे शोषण होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने 2013 मध्ये “महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013” हा कायदा तयार केला आहे. हा कायदा करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती(अंनिस)चे संस्थापक दिवंगत नरेंद्र दाभोळकर यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी या कायद्याचा मसूदा तयार केला आहे.

हा कायदा जादूटोणा, नरबळी, आजार बरे करण्यासाठी काळ्या जादूचा वापर आणि अशाच प्रकारच्या अनेक कृती ज्यामुळे लोकांचे अंधश्रद्धेतून शोषण होऊ शकेल ते कृत्य गुन्हेगारी अपराध ठरवितो. या कायद्याचे उल्लंघन केल्यास कमीतकमी सहा महिने शिक्षा आणि जास्तीत जास्त सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.