AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळा तोंडावर, गंगाखेडचा रेल्वे उड्डानपूल जैसे थे, आ.गुट्टे म्हणतात, मी काम करतो!

गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेडच्या रेल्वे उड्डानपुलाचं काम मी करतो अशी भूमिका घेतली आहे. (I am ready work on the railway flyover of Gangakhed Says MLA Ratnakar Gutte)

पावसाळा तोंडावर, गंगाखेडचा रेल्वे उड्डानपूल जैसे थे, आ.गुट्टे म्हणतात, मी काम करतो!
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 8:40 AM
Share

परभणी : मुंबई-पुणे-नांदेड अशा महत्वाच्या रोडवर असलेला गंगाखेड रेल्वे उड्डाणपूल अजूनही पूर्ण होताना दिसत नाही. गेल्या 12 वर्षापासून ह्या उड्डाणपुलाचं काम सुरु आहे. पावसाळा तोंडावर असताना काम संथ गतीनं म्हणजेच जवळपास थांबल्यात जमा आहे. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांनी हे काम आता मीच करतो अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी आवश्यक असणारी 24 लाखाची अनामत रक्कमही त्यांनी पीडब्ल्यूडी विभागाकडे सुपूर्द केली आहे. (I am ready work on the railway flyover of Gangakhed Says MLA Ratnakar Gutte)

I am ready work on the railway flyover of Gangakhed Says MLA Ratnakar Gutte

I am ready work on the railway flyover of Gangakhed Says MLA Ratnakar Gutte

I am ready work on the railway flyover of Gangakhed Says MLA Ratnakar Gutte

काय आहे प्रकरण?

गंगाखेड-नांदेड रोडवर रेल्वे उड्डाणपूल आहे. हा पूल गेल्या 12 वर्षापासून बांधला जातोय. कॉन्ट्रॅक्टर आणि सरकारी काम ह्यांच्या कचाट्यात हा पूल असा कासवगतीनं बांधला जात असल्याचं गंगाखेडकरांचं म्हणणं आहे. उड्डाणपुलाचा पत्ता नसल्यामुळे रेल्वेचं फाटक दिवसभरात बहुतांश वेळा बंदच रहातं. कॉन्ट्रॅक्टरनं एक कच्चा रस्ता वाहतुकीसाठी काढून दिला आहे पण तो पावसाळ्यात एवढा घसरडा होतो की गाड्या स्लीप होतात, अपघातात होतात. गेल्या बारा वर्षात ह्या फाटकाजवळ अडकून दोनशेपेक्षा जास्त महिलांची डिलिव्हरी ह्या फाटकाजवळच झाल्याचं आ.गुट्टे यांचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर अपघातात शंभरपेक्षा जास्त जणांचे बळी गेल्याचही आमदार सांगतात.

पूलाची सध्यस्थिती काय आहे?

पावसाळा सुरु झाला असून पूलाचं कामच झालेलं नाही. आ. गुट्टे यांनी काही दिवसांपुर्वी हा पूल तातडीनं पूर्ण करा म्हणून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केलेलं होतं. त्यावेळेस प्रशासनानं काम लवकरच पूर्ण होईल असं आश्वासन दिलं होतं. पण काम पूर्ण झालेलं नाही. आता आ. गुट्टेंनी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन दिलं आहे. त्यानुसार फक्त 24 लाख 80 हजार रुपयांचं पुलाचं काम बाकी आहे. ते जर कॉन्ट्रॅक्टर पूर्ण करत नसेल तर त्याची अनामत रक्कम जप्त करावी अशी मागणी आ. गुट्टेंनी केली आहे.

एवढंच नाही तर सरकारकडे एवढा पैसा नसेल तर खुद्द गुट्टेंनी ती रक्कम भरण्याची तयारी दर्शवली आहे. तशा धनादेशाचा चेकही त्यांनी पीडब्ल्यूडी खात्याच्या इंजिनिअरच्या नावे दिला आहे. पुलाचं काम स्वत: पूर्ण करण्याची तयारीही आ.गुट्टेंनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत केली आहे.

(I am ready work on the railway flyover of Gangakhed Says MLA Ratnakar Gutte)

हे ही वाचा :

Weather Alert Monsoon prediction : विदर्भात 100 टक्के, मराठवाड्यात 98 टक्के, यंदा कोणत्या विभागात किती पाऊस?

जालन्याला अ‍ॅलर्ट! ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार, जोरदार पावसाचाही इशारा

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...