उद्धव ठाकरे आणि राऊतांचं ते रेकॉर्डिंग माझ्याकडे, मी दाखवलं तर.., बडगुजरांनी टाकला पहिला बॉम्ब
सुधाकर बडगुजर यांची आज शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे, या हकालपट्टीनंतर त्यांनी आता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली, यावेळी त्यांनी मोठा दावा केला आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटानं आज सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर आता बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. खरं बोलणं, आणि नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केला आहे, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं बडगुजर यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले बडगुजर?
खरं बोलणं, आणि नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केला आहे, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, प्रवासात असतांना मला माहिती मिळाली, यापूर्वी माझ्यावर हकालपट्टीची कारवाई झाली नव्हती, पहिल्यांदाच कारवाई झाली. निर्णय झाल्यानंतर संपर्क कसा साधतील? पक्षाच्या विरोधात मी काम केलं असेल तर दाखवावं, विलास शिंदेंच्या कार्यक्रमाला सगळे गेले, मी गिरीश महाजन यांच्या शेजारी उभा राहिलो म्हणून फोटो आला. म्हणून कारवाई केली, केलेल्या कारवाईवर मी नाराज नाही. मला एक वाक्य दाखवा जे मी पक्षविरोधी काय काम केलं, असं बडगुजर यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोना काळात काम केलं, रक्तदान शिबिरं घेतले, शाखा उद्घाटन केलं, कार्यालयात काम केलं, संघटना बांधणीसाठी काम केलेले असतांना माझ्यावर कारवाई केली. मुख्यमंत्री यांची भेट घेतली, निवेदन दिले, त्यामुळे पक्षात वादळ निर्माण झालं. आता निवडणूक नाही, सदस्य नाही. प्रश्न प्रलंबित आहे म्हणून मुख्यमंत्री यांना भेटलो. पक्षाच्या नेतृत्वाला मी ते सांगितले होते. आज मी पत्रकार परिषदेला नव्हतो हे मी सांगितले होते. मी संघटनेला बाधा येईल, असे वाक्य दाखवलं तर संन्यास घेईल. गिरीश महाजन काय बोलले ते आम्हाला माहिती नाही. राऊतांनी मेसेज केला, मी पण त्याला रिप्लाय केला, काल माझ्याशी उद्धव ठाकरे, संजय राऊत बोलले. त्यांची माझ्याकडे रेकॉर्ड आहे. मी ते रेकॉर्डिंग दाखवलं तर वेगळं होईल, पण मी ती दाखवणार नाही. निवेदनाच्या बातम्या आल्यावर जिल्हाप्रमुखांच्या गाडीत बसले, तेव्हाच माझ्या मनात शंका आली होती, असं बडगुजर यांनी म्हटलं आहे.
