AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता PNG असेल तरच ओसी मिळणार? दिल्लीतील बैठकीत चर्चा काय? भुजबळांनी दिली मोठी माहिती

Chhagan Bhujbal : आज दिल्लीत CNG आणि PNG गॅस पुरवठा कसा सुरळीत करता येईल याबाबत बैठक झाली. या बैठकीला राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित होते. यानंतर त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

आता PNG असेल तरच ओसी मिळणार? दिल्लीतील बैठकीत चर्चा काय? भुजबळांनी दिली मोठी माहिती
minister chhagan Bhujbal Image Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 28, 2026 | 4:47 PM
Share

आखाती देशांमधील तणावामुळे राज्यासह देशाच्या विविध भागात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरसाठी आणि पेट्रोलसाठी रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर CNG आणि PNG गॅस पुरवठा कसा सुरळीत करता येईल याबाबत आज राजधानी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला सगळ्या राज्यांचे पुरवठा मंत्री आणि सचिव यांना निमंत्रण देण्यात आलं होते. राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना छगन भुजबळ यांनी मोठी माहिती दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

बैठकीत काय चर्चा झाली?

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले की, मनोहरलाल खट्टर, हरदीप सिंह पुरी आणि प्रल्हाद जोशी या केंद्रीय मंत्र्‍यांसह इतर राज्यामधील मंत्री बैठकीला उपस्थित होते. यावेळी PNG जोडणी जास्तीत जास्त करून घेतली पाहिजे यावर त्यांनी भर दिला. PNG जोडणी सक्तीची केली तरच तुम्हाला OC मिळेल असं काही करता येईल का यावर चर्चा झाली.

PNG जोडणी वाढवण्यावर भर

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, PNG जोडणी ताबडतोब करण्याच्या सूचना मंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना तातडीने जोडणी करण्यावर भर देण्यात आला आहे. या पाइपलाइन साठी अनेक परवानग्या मागितल्या जातात पण त्या मिळत नसल्याने उशीर होत आहे, त्यामुळे त्या परवानग्या मागीतल्यानंतर मिळाल्या असं गृहीत धरून काम करण्यास सांगितलं आहे. PNG जोडणी ताबडतोब करण्यासाठी बाकी गोष्टी बाजूला ठेवा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

… तर LPG बंद होणार

छगन भुजबळ यांनी पुढे बोलताना सांगितले की, जिथे जिथे PNG सुरू आहे तिथे तेथील लोकांनी तातडीने PNG कनेक्शन घ्यावं असं न केल्यास तीन महिन्यात LPG बंद होऊ शकतो. साडेतीन हजार किलो लिटर केरोसीन महाराष्ट्राकडे आहे. जिथे PNG आणि CNG कमी पोहोचत आहे तिथे केरोसीन (रॉकेल) पोहोचलं पाहिजे, त्याच्या वापराची परवानगी दिली आहे. इतर देशांतून ऑईल येत आहे, आपल्या रिफायनरी देखील जास्तीत जास्त काम करत आहेत. लॉकडाऊन अजिबात लागणार नाही.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात