AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Crisis : ..तर तीन महिन्यात सिलेंडर बंद होईल, छगन भुजबळ यांनी इशारा दिला त्याचा अर्थ काय?

LPG Crisis : "आता साखळी तुटलेली आहे. मुख्य डीलर असायचा. एक बैलाची गाडी यायची. ते केरोसिन घेऊन सगळीकडे जायचे. मुंबईत पीएनजी, एलपीजी असल्याने केरोसिन कमी लागेल. अनेक शहरात पीएनजी, एलीपीजी कमी आहे"

LPG Crisis : ..तर तीन महिन्यात सिलेंडर बंद होईल, छगन भुजबळ यांनी इशारा दिला त्याचा अर्थ काय?
chhagan bhujbal
| Updated on: Mar 28, 2026 | 1:51 PM
Share

मध्य पूर्वेतील युद्धामुळे एलपीजी संकट निर्माण झालं आहे. केंद्र सरकारकडून एलपीजी गॅसचा पुरेसा साठा असल्याचं सांगण्यात येतय. पण गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर रांगा लागल्याचं चित्र आहे. भारताचा एलपीजीचा मोठा भाग आखाती देशांमधून येतो. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून इराण सहजासहजी जल वाहतुकीची परवानगी देत नाहीय. त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. “मुंबई, नाशिक, पुणे येथे पीएनजी सुरु आहे, तिथे त्यांनी घ्यावं. पीएनजी जिथे काम सुरु झालेलं आहे. फार लांबच्या ठिकाणी अजून तिथे लाइन गेली नाही तिथे तुम्हाला सिलेंडर मिळणार” असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

“तिथे तुम्ही पीएनजी घेऊ शकता आणि तरी सुद्धा घेतला नाही तर तुमचं सिलिंडर बंद. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या इमारतीत पीएनजी नाहीय. मी विचारलं की पीएनजी का नाही, तर त्यांनी सांगितलं की शेजारच्या इमारतीची, महापालिकेची परवानगी नाही. असं जर असेल तर तीन महिन्यात माझा सिलेंडर बंद होणार. या परवानग्यांची आता गरजच नाही अशी ऑर्डर काढली आहे” असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

उज्वला दिलय तर केरोसिनची गरज काय?

मुंबईत केरोसिनसाठी रांगा दिसतायत? त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, “शहरी भागातच नाही, खूप ठिकाणी केरोसिनची मागणी होत आहे. हायकोर्टाची ऑर्डर होती, उज्वला दिलय तर केरोसिनची गरज काय? केरोसिन असताना देऊ शकत नव्हतो. परंतु प्राप्त परिस्थितीत हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. आपण हाय कोर्टाला कळवलं आहे, 3500 हजार किलो लीटर केरोसिन महाराष्ट्राकडे आहे”

परवानग्या मिळाल्या समजून कामाला लागावं

“दर महिन्याचा कोटा आहे. आता साखळी तुटलेली आहे. मुख्य डीलर असायचा. एक बैलाची गाडी यायची. ते केरोसिन घेऊन सगळीकडे जायचे. मुंबईत पीएनजी, एलपीजी असल्याने केरोसिन कमी लागेल. अनेक शहरात पीएनजी, एलीपीजी कमी आहे. तिथे केरोसिन वापराला परवानगी दिली आहे. जुने डिलर्स आहेत केरोसिनचे. त्यांच्या काही परवानग्या असतात. रिन्यूलं असेल. ते त्यांनी झालं समजावं. त्यांना काम करायला परवानगी आहे. वारसाच्या नावाने वैगेरे काही परवानग्या असतील. त्या मिळाल्यात समजून त्यांनी कामाला लागावं” असं छगन भुजबळ म्हणाले.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर