AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्ते आहेत तर अपघात होणारच, चिमुरड्याच्या मृत्यूनंतर भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे भयंकर वक्तव्य

बावधन पोलिसांनी ट्रकचा कोणताही थेट धक्का लागलेला नसतानाही केवळ ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे, ज्यामुळे चोर सोडून संन्यासाला फाशी दिल्याचा प्रकार घडल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत असतानाच आता आमदार शंकर मांडेकर यांच्या वक्तव्याने भर पडली आहे.

रस्ते आहेत तर अपघात होणारच, चिमुरड्याच्या मृत्यूनंतर भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे भयंकर वक्तव्य
Bhor NCP MLA Shankar Mandekar
| Updated on: Aug 18, 2026 | 4:57 PM
Share

भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी भयंकर वक्तव्य केले आहे. रस्ते आहेत तर अपघात होणारच असे निष्ठूरपणे आमदार शंकर मांडेकर यांनी म्हटले आहे.पुणे महापालिका हद्दीतील म्हाळुंगे-नांदे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात रिषभ पाटोळे या चिमुकल्याचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावर पत्रकारांनी याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल केला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांनी हे चिड आणणारे वक्तव्य केले आहे.

पुणे महापालिका हद्दी म्हाळुंगे – नांदे रस्त्यावर खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात रिषभ पाटोळे या चिमुकल्याचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात ट्रकचा कोणताही थेट धक्का लागलेला नसतानाही केवळ ट्रक चालकावरच बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे चोर सोडून संन्यासाला फाशी दिल्याचा प्रकार घडला आहे. रस्त्याची चाळण करणाऱ्या जबाबदार अधिकारी आणि यंत्रणांवर कोणतीही कारवाई न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, घटनेनंतर स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना संतप्त नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. त्यांनी याप्रकरणात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले.

आमदार काय म्हणाले नेमके ?

रोड आहेत तर अपघात होणार आहे. ज्याची मोठी गाडी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो असे असंवेदनशील वक्तव्य आमदार शंकर मांडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले. त्यावेळी त्यांनी पत्रकाराला एकेरी भाषेत तु पत्रकार आहे तर मी जबाबदार आमदार आहे असेही म्हटले. अपघात झाल्यावर गाडी चालकावर गुन्हा दाखल होत असतो. होऊ नये पण काय करणार ? मी काय आवाज उठवत नाही. तुम्ही आज मला प्रश्न विचारताय, मी दोन वर्षे सभागृहात आवाज उठवत आहे. माझ्या उपस्थितीचे कार्ड दाखवू का ? असेही आमदार मांडेकर पत्रकारांना म्हणाले. शेवट गर्व्हमेंट आहे मी तरी काय करणार त्याला असे म्हणत त्यांनी एकप्रकारे हात वर केल्याने संताप व्यक्त होत आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...