AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या निर्णायवर डॉक्टर खवळले, आज एक दिवसाचा संप सुरू; रुग्णांचे हाल

BHMS डॉक्टरांना CCMP कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ 24 तासांच्या वैद्यकीय सेवाबंदची हाक IMA कडून पुकारण्यात आली आहे. भारतीय वैद्रद्यकीय संघटना (IMA), महाराष्ट्र राज्य, MARD, ASMI तसेच इतरविविध विशेषज्ञ वैद्यकीय संघटनांचा या काम बंद आंदोलनाला एकत्रित पाठिंबा आहे.

त्या निर्णायवर डॉक्टर खवळले, आज एक दिवसाचा संप सुरू; रुग्णांचे हाल
| Updated on: Aug 04, 2026 | 12:34 PM
Share

BHMS-CCMP डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउंसिलमध्ये नोंदणी देण्याचा विचार केला जात आहे, जो सर्वोपचार (Allopathic) वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या दृष्टीने आधुनिक वैद्यकशास्त्राचा दर्जा, प्रामाणिकपणा आणि वैज्ञानिक आधाराला धक्का देणारा आहे, तसेच सार्वजनिक आरोग्य आणि रुग्ण सुरक्षिततेवर दीर्घकालीन गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भूमिका आयएमए त्यासोबतच इतर संघटनांनी घेतली आहे

यासंदर्भात संबंधित शासकीय विभाग आणि मंत्रालयाकडे अनेक वेळा निवेदने, पत्रव्यवहार आणि पत्रकार परिषदां‌द्वारे चिंता व्यक्त करण्यात आली आहे, तरीही वैद्यकीय क्षेत्रातील या चिंतेकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही, त्यामुळे मंगळवारी सकाळी सहा ते बुधवारी सकाळी सहा पर्यंत आयएमएने सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या व्यापक हितासाठी आणि पुराव्यावर आधारित आधुनिक वैद्यकीय पद्धतींचे मानदंड जपण्यासाठी हा निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेत आहे, असं आयएमएकडून सांगण्यात आलं आहे. हा निषेध 4 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता सुरु झाला असून 5 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत चालेल. तसेच, जर नोंदणी प्रक्रिया सुरू झाली, तर हे सेवा बंद आंदोलन अनिश्चित काळासाठी सुरू ठेवण्यात येईल, असं सुद्धा पत्रकाद्वारे सांगितलं आहे

सांगायचं झालं तर, 3 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार (GR) एक वर्षाचा प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केलेल्या होमियोपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी (आधुनिक वैद्यकशास्त्र) प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाच्या विरोधात डॉक्टरांनी एक दिवसाचा वैद्यकीय सेवा बहिष्कार जाहीर केला आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास तातडीने आणीबाणी सेवा देखील बेमुदत बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

MARD JJ हॉस्पिटलचे अध्यक्ष विनायक शाह यांनी सांगितल्यानुसार, आम्ही संपावर जात आहे, सेंट्रल मार्डसह राज्य भर संप असणार. पहिल्या टप्पायत अत्यावशक सेवा सुरू राहतील, पण पुढे ते ही बंद होतील. सुरुवातीचे 24 तासात OPD बंद राहणार. पण जर उत्तर आलं नाही तर अत्यावशक सेवा बंद करणार BHMS चे निर्णय अद्याप झालेले नाहीत.

शाह पुढे म्हणाले, ‘CCMP चे रजिस्ट्रेशन झालेलं नाही, अशात रजिस्ट्रेशनचा मुद्दा त्याविरोधात आमचा संप आहे. जे निवासी डॉक्टर आहे त्याबाबत ही आम्ही अनेक मुद्दे मांडले आहेत, आमचा मुद्दा आहे की तुमचे शिक्षण ज्यामध्ये आहे त्यात प्रॅक्टिस करावी. आता हे असे करत आहे की होमोपॅथी मध्ये शिक्षण घेतले असले तरू पण पुढे अलोपथ्यीची प्रॅक्टिस करायची. त्यांनी एक कोर्स रजिस्ट्रेशन सुरू केला आहे आणि मिक्सोपॅथी सुरू करत आहे… असं म्हणत शाह यांनी विरोध केला.

Follow Us
कर्ज फेडलं तरी जमीन गेली? नाशिकमध्ये शेतकऱ्याच्या जमिनीचा मोठा घोटाळा
कर्ज फेडलं तरी जमीन गेली? नाशिकमध्ये शेतकऱ्याच्या जमिनीवर मोठा घोटाळ्याचा आरोप
PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर E20 इंधन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर...
PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर E20 इंधन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; थेट...
महाराष्ट्राने ज्येष्ठ नेतृत्व गमावले; डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
महाराष्ट्राने ज्येष्ठ नेतृत्व गमावले; काँग्रेस नेते डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
मोठी खळबळ! अभिजीत दीपके यांच्या विरोधात थेट पोलिसांत FIR, तातडीने...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके यांच्या विरोधात थेट पोलिसांत FIR, तातडीने अटकेची मागणी
राम मंदिरावर बोलले... पण सिद्धिविनायकवर प्रश्न येताच राऊतांनी उत्तर...
राम मंदिरावर बोलले... पण सिद्धिविनायकवर प्रश्न येताच संजय राऊतांनी उत्तर टाळलं!
भाजपची लोकप्रियता घरसत आहे, सहाच महिन्यात 40 हजारांहून अधिक मतदार....
भाजपची लोकप्रियता घरसत आहे, सहाच महिन्यात 40 हजारांहून अधिक मतदार.... राऊतांनी बिहार पोटनीवडणुकीबाबत नेमकं काय सांगितलं?
TV9 मराठीच्या बातमीची दखल! दोन बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग
TV9 मराठीच्या बातमीची दखल! दोन बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग; ठाण्यात रस्त्यांची तात्पुरती डागडुजी
रस्त्यावर ऑइल-चिखलाचा थर; 15 वाहनांची घसरगुंडी, नेमकं काय घडलं?
पुण्यात एकामागोमाग एक अपघात! रस्त्यावर ऑइल-चिखलाचा थर; 15 वाहनांची घसरगुंडी, नेमकं काय घडलं?
धनुष्यबाण कुणाचा? आज अंतिम लढत; सुप्रीम कोर्टात रंगणार युक्तिवाद
मोठी बातमी! धनुष्यबाण कुणाचा? आज अंतिम लढत; सुप्रीम कोर्टात पुन्हा रंगणार युक्तिवाद
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय...
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?