AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon: ‘ला निना’चा परिणाम, मान्सूनचा मुक्काम सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत

‘ला निना’च्या प्रभावामुळे भारतात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस आहे. मान्सूनचा मुक्काम वाढणार असल्यामुळे खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच खरीप लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे.

Monsoon: ‘ला निना’चा परिणाम, मान्सूनचा मुक्काम सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत
मान्सूनचा मुक्काम वाढणार
| Updated on: Aug 30, 2024 | 10:52 AM
Share

Monsoon 2024: देशात यंदा मान्सून चांगलाच बसरसत आहे. अनेक ठिकाणी पावसाने सरासरी गाठली आहे. यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतीचा मान्सून सुरु होतो. परंतु यंदा सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मान्सून लांबण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ‘ला निना’च्या प्रभावामुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चांगला पाऊस आहे. गेल्या पाच दिवसांपासून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे. पावसाची ही परिस्थिती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कायम राहणार आहे.

भारतात केरळमध्ये मे महिन्यात मान्सूनचे आगमन होते. त्यानंतर देशभरात जून महिन्यात मान्सून पोहचतो. चार महिने मुक्काम करणारा मान्सून सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतीचा प्रवास सुरू करतो. परंतु यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सूनचा परतीचा मुक्काम सुरु होणार आहे. यामुळे ऑक्टोबरमध्ये देशात मान्सून राहणार आहे.

गणेशोत्सवात असणार पाऊस

कोकण विभागात ७ ते १२ सप्टेंबरच्या आठवड्यामध्येही पावसाची तीव्रता जास्त असणार आहे. उत्तर गुजरातवरील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत मुंबई, उत्तर मध्य महाराष्ट्रात पावासाची शक्यता आहे. महाराष्ट्रात सर्वत्र यंदा आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठाही वाढला आहे.

यंदा का वाढणार मुक्काम

‘ला निना’च्या प्रभावामुळे भारतात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस आहे. मान्सूनचा मुक्काम वाढणार असल्यामुळे खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच खरीप लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे. यंदा आतापर्यत 7 टक्के अधिक पाऊस झाला आहे. यंदा गणेशोत्सात पाऊस असणार आहे.

गुजरातमध्ये सुरु असलेला मुसळधार पाऊस शुक्रवारपर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होणार आहे. सौराष्ट्र भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पावसाचा जोर असणार आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.