आनंदाची बातमी! पुढच्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार, नद्या नाले एक होणार, हवामान विभागाचा मोठा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र आता दिलासादायक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

आनंदाची बातमी! पुढच्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार, नद्या नाले एक होणार, हवामान विभागाचा मोठा इशारा
IMD Rainfall Forecast
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 13, 2026 | 7:33 PM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाअभावी पिके सुकून चालली आहे. परंतु आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रासह तब्बल 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात प्रति तास 75 किमी वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व भारतात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, पर्वतीय भागांमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडू शकतात, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. तर आठ राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.

21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

पुढील 24 तासांमध्ये देशासह राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू -काश्मीर, लडाख, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, सिक्कीम, छत्तीसगड, महाराष्ट्र, आसाम, मेघालय, केरळ आणि कर्नाटक अशा 21 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात जोरदार वादळाची देखील शक्यता असून, ताशी 70 ते 75 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असं आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्रात एक जुलै ते आठ जुलै दरम्यान अतिमुसळधार पाऊस झाला, या पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूर संकट ओढावलं होतं, परंतु आता पावसाने अचानक उघडीप दिली आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाऊस झालेला नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परंतु दिलासादायक बातमी म्हणजे पुढील एक, दोन दिवसांमध्ये राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अनेक भागांमध्ये चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात चांगला पाऊस झाल्यानं धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

Follow Us