AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Forecast : चला, छत्र्या काढा.. उन्हाचा नव्हे हो पावसाचा बसेल तडाखा ! राज्यात कुठे ऑरेंज अलर्ट ?

पुढील तीन दिवस राज्यात पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले होते. त्यामुळे राज्यात आजही जोरदार पावसाची शक्यता आहे. बारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून संपूर्ण राज्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

IMD Weather Forecast : चला, छत्र्या काढा.. उन्हाचा नव्हे हो पावसाचा बसेल तडाखा ! राज्यात कुठे ऑरेंज अलर्ट ?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Apr 02, 2025 | 10:45 AM
Share

एप्रिल महिन्याच्या सुरूवातील राज्यातील नागरिक उन्हाच्या तडाख्याने त्रस्त झालेलेल असतानाच आता हवामाना विभागाने वेगळाच अंदाज वर्तवला आहे. काल राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाची हजेरी अनेक भागांत लागल्याने त्रेधातिरपीट उडाली होती. दरम्यान राज्यात आजही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुढील तीन दिवस राज्यात पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले होते. त्यामुळे राज्यात आजही जोरदार पावसाची शक्यता आहे. बारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून संपूर्ण राज्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कुठे कुठे पडणार पाऊस ?

राज्याला बुधवारी आणि गुरुवारी देखील अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी बारा जिल्ह्यांना ऑरेंज तर अवघ्या राज्याला येलो अलर्ट देण्यात आला. तसेच गुरुवारी देखील यलो अलर्ट देण्यात आला असून शुक्रवारपासून पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कुठे देण्यात आला ऑरेंज अलर्ट ?

राज्यातील अनेक भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, चंद्रपूरचा समावेश आहे.

पुढील दोन दिवस पावसाचे

राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यानंतर काही ठिकाणी दुपारपासून विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस कोसळला. याच पार्श्वभूमीवर पुढीस 2 दिवसही महाराष्ट्रात विविध भागांत पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. घाट माथ्यासह शहरात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवकाळी पावसासाठी अलर्ट रहावे आणि सज्ज रहावे अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

जालन्यात पावसाचा रब्बी पिकांना फटका, गहू – मका पीकाचं नुकसान

जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील मक्का आणि गहू पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. घनसावंगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आणि या पावसामुळे गहू आणि मक्का पिकाचं मोठ नुकसान झालं. काढणीला आलेला गहू आणि मका पीक अवकाळी पावसामुळे आडवं झालं आहे. दरम्यान या बेमोसमी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.  दोन दिवसापासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा बीज उत्पादक आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.