Weather Update : अरे देवा! अजून काय काय पहावं लागणार रे? वातावरणात मोठा बदल; महाराष्ट्रावर आता नवं संकट, थेट मोठा इशारा
यंदा महाराष्ट्रासह देशात एल निनोचं मोठं संकट आहे. एल निनोमुळे राज्यात पावसामध्ये खंड पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. एकीकडे पाऊस पडला नसतानाच आता पुन्हा एकदा एक मोठा इशारा देण्यात आला आहे.

भारतामधून आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आता लवकरच भारतामध्ये हिवाळ्याला सुरुवात होईल. यंदा देशात ऐल निनोचं मोठं संकट आहे. एल निनोमुळे देशातील अनेक भागांमध्ये पाऊसच झालेला नाहीये. महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास यंदा राज्यात भीषण परिस्थिती आहे. मराठवाड्या सारख्या भागात तर यंदा सरासरीपेक्षा 30 ते 40 टक्के कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्राच्या इतरही भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. पाऊसच न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम तर हातचा गेलाच आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे आता रब्बी हंगामावर देखील मोठं संकट निर्माण झालं आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काळात एल निनो हा अधिक तीव्र होत जाणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी 2027 पर्यंत राज्यात ऐल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात एल् निनो अधिक तीव्र होत जाणार असल्यामुळे यंदा राज्यासह देशात थंडी देखील कमी पडणार आहे. थंडीमध्ये देखील गरम वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच बर्फ वृष्टी होण्याची देखील शक्यता कमी आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे तापमान हे सरासरी पेक्षा अधिक राहणार आहे, त्यामुळे यंदा राज्यासह देशभरात थंडी कमी राहणार आहे. दरम्यान जर यंदा देशात थंडीचं प्रमाण कमी राहिलं तर याचा विपरीत परिणाम हा रब्बी हंगामातील पिकांवर देखील पडणार आहे. रब्बी हंगामातील पिकांना गारठ्याची गरज असते, मात्र तापमान वाढीमुळे ही पिकं देखील संकटात सापडले आहेत.
सुपर एल निनो प्रभाव
दरम्यान एल निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात तर पाऊस झालाच नाही, मात्र पुढील काही महिन्यात हा एल निनो सुपर एल निनोमध्ये रुपांतरी होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत राज्यात सुपर एलनिनोची शक्यता आहे. या एलनिनोचा प्रभाव हा भारतात पुढील वर्षी फेब्रुवारी 2027 पर्यंत राहु शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
