AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Rain Alert : पुढचे 5 दिवस धोक्याचे, वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस राज्याला झोडपणार, अलर्ट जारी

IMD Weather Update : पुढील 5 दिवस राज्याच्या विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. तसेच शेतकऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

IMD Rain Alert : पुढचे 5 दिवस धोक्याचे, वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस राज्याला झोडपणार, अलर्ट जारी
Heavy Rain AlertImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 31, 2026 | 3:44 PM
Share

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे, नाशिक, धुळे, जळगावसह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांचेही नुकसान झाले आहे. मात्र अजूनही राज्यावरील संकट टळलेले नाही. पुढील 5 दिवस राज्याच्या विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुढील 5 दिवस धोक्याचे

पुणे हवामान विभागाचे प्रमुख सुदीप कुमार यांनी सांगितले की, पुण्यासह राज्यात पुढचे पाच दिवस पावसाची शक्यता आहे. आजही वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट, तर काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन

पुढे बोलताना सुदीप कुमार यांनी सांगितले की, ‘पुण्यासह राज्यभरात काल मुसळधार पाऊस पडला, तर काही भागात गारपीट तसेच काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आता पुढील पाच दिवस ही पावसाचे असणार आहेत. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दररोज दुपारनंतर पाऊस पडेल. 4 तारखेनंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो. गारांच्या पावसामुळे शेतीचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. विजांच्या कडकडाट हा पाऊस होणारं असल्यानं शेतकऱ्यांनी मोकळ्या जागेत आणि झाडाखाली थांबू नये असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळला. या वादळामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आंब्याची 50% फळे वादळामुळे गळून पडल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पुढील पाच दिवस धाराशिव जिल्ह्यात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...