AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD weather updat : राज्यात अतिवृष्टीचा इशारा, पुढील 48 तास घराबाहेर पडूच नका, या जिल्ह्यांसाठी धोक्याची घंटा

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील 48 तासांमध्ये अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

IMD weather updat : राज्यात अतिवृष्टीचा इशारा, पुढील 48 तास घराबाहेर पडूच नका, या जिल्ह्यांसाठी धोक्याची घंटा
IMD Weather UpdateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 27, 2026 | 7:46 PM
Share

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवस विदर्भाचा काही भाग, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे.   पुणे घाटमाथा, कोकण किनारपट्टी, भंडारा, गडचिरोली, अमरावती , चंद्रपूर या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडू शकतो, अशी माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तर दुसरीकडे विदर्भात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भात अतिवृष्टीचा इशारा  

विदर्भात गेल्या आठवड्यात पावसाचा जोर ओसरला होता, परंतु आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात 28 आणि 29 जुलैदरम्यान अतिवृष्टीचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागगपूर हवामान विभागाने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढणार 

दरम्यान राज्यात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे, सर्वत्र जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 28 आणि 29 जुलै या दोन दिवशी अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

1 जून ते 27 जुलै या काळात  संपूर्ण विदर्भातील 11 जिल्हात एकूण 26 टक्के पावसाची तूट निर्माण झालेली आहे. जुलै महिन्यात निर्माण झालेली पावसाची तूट काही प्रमाणात आता या पावसाने भरून निघण्याची श्यक्यता आहे, मात्र तरी देखील संपूर्ण तूट भरून निघण्याची शक्यता कमीच आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट 

दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  अरबी समुद्रातील मान्सूनच्या वाऱ्याच्या प्रभावामुळे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. कालपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे खेडमधील जगबुडी, चिपळूण मधील वाशिष्टी आणि रत्नागिरी मधील काजळी नदी दुथडी भरून वाहत आहे.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार